शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Nobel Price: युक्रेनच्या बालकांसाठी ‘नोबेल’चा केला लिलाव, पाच लाख डॉलरची रक्कम देणार युनिसेफला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 06:40 IST

Nobel Price: रशियाचे पत्रकार दिमित्री मुरातोव यांनी आपल्याला शांततेसाठी मिळालेल्या नोबेल पुरस्काराचा लिलाव करून त्यातून मिळालेली ५ लाख डॉलरची रक्कम ते युक्रेनच्या बालकांच्या मदतीसाठी युनिसेफकडे सुपुर्द करणार आहेत. 

न्यू यॉर्क : गेले काही महिने सुरू असलेल्या युद्धामुळे युक्रेनच्या असंख्य बालकांसह लाखो नागरिकांना निर्वासित व्हावे लागले आहे. रशियाचेपत्रकार दिमित्री मुरातोव यांनी आपल्याला शांततेसाठी मिळालेल्या नोबेल पुरस्काराचा लिलाव करून त्यातून मिळालेली ५ लाख डॉलरची रक्कम ते युक्रेनच्या बालकांच्या मदतीसाठी युनिसेफकडे सुपुर्द करणार आहेत. मुरातोव यांना गेल्या ऑक्टोबर महिन्यात शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांनी नोवाया गॅझेट या वृत्तपत्राची स्थापना केली होती. युक्रेनवर रशियाने केलेल्या आक्रमणामुळे निर्माण झालेला असंतोष दडपण्यासाठी तसेच पत्रकारांवर रशियाच्या सरकारने सुरू केलेली कारवाई पाहता ‘नोवाया गॅझेट’ हे वृत्तपत्र मुरातोव यांना गेल्या मार्च महिन्यात बंद करावे लागले होते. दिमित्री मुरातोव म्हणाले, युद्धामुळे युक्रेनमधील निर्वासित व्हावे लागलेल्या बालकांना सर्वांनी मोठ्या प्रमाणावर मदत करण्याची गरज आहे. युक्रेनमधील संघर्षात जी बालके अनाथ झाली, त्यांची आपल्याला विशेष काळजी वाटते. या दुर्दैवी जीवांचे भविष्य अंधकारमय होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. रशियामध्ये दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना तसेच शस्त्रक्रियांसाठी लागणाऱ्या औषधांचा पुरवठा आंतरराष्ट्रीय समुदायाने थांबवू नये, असे आवाहनही मुरातोव यांनी केले आहे. त्यांच्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठीचा लिलाव हेरिटेज ऑक्शन्स या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला. (वृत्तसंस्था)

क्रिमियावरील आक्रमणाचा केला होता निषेधn२०१४ साली रशियाने क्रिमियावर आक्रमण करून तो भूभाग हडप केला होता. त्या कारवाईविरोधात रशियाचे पत्रकार दिमित्री मुरातोव यांनी जोरदार आवाज उठविला होता.nदिमित्री मुरातोव व फिलिपाईन्सची पत्रकार मारिया रेसा यांना गेल्या वर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार विभागून देण्यात आला होता.

टॅग्स :Nobel Prizeनोबेल पुरस्कारrussiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाJournalistपत्रकार