शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
2
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
3
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
4
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
5
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
6
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
7
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
8
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
9
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
10
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
11
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
12
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
13
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
14
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
15
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...
16
Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)
17
अंतर्गत मतभेदांदरम्यान टाटा ट्रस्ट्सनं वेणू श्रीनिवासन यांची आजीवन विश्वस्त म्हणून केली नियुक्ती; आता मेहली मिस्त्री यांच्यावर नजर
18
मोठी बातमी! सोन्या-चांदीचा बुडबुडा फुटला....! एकच झटक्यात सोनं 3725 तर चांदी 10549 रुपयांनी स्वस्त! जाणून घ्या कारण
19
भारी! WhatsApp, Instagram चॅटिंग होणार सुरक्षित; स्कॅम रोखण्यासाठी मेटाने आणलं नवीन टूल
20
हिऱ्याच्या खरेदीपूर्वी ‘हे’ चार नियम माहीत करून घ्या! कट, क्लॅरिटी, कलर, कॅरेटचा फॉर्म्युला काय सांगतो?

कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 14:50 IST

Donald Trump shares Barak Obama Video: एखाद्या राष्ट्राध्यक्षाने माजी राष्ट्राध्यक्षाबाबतचा असा व्हिडीओ पोस्ट करणे हे धोकादायक मानले जात आहे. 

अमेरिकेत सध्या रिव्हेंज पॉलिटिक्स सुरु झाल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना एफबीआयचे एजंट अटक करतानाचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. समोर ट्रम्प बसलेले असून ते हसत आहेत, तर ओबामांना अमेरिकेत गुन्हेगारांना पकडतात तसे खाली पाडले जात असल्याचे यात दाखविण्यात आले आहे. यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे हा व्हिडीओ जरी एआय जनरेटेड वाटत असला तरी ट्रम्प यांनी मात्र तसे काही म्हटलेले नाही. एखाद्या राष्ट्राध्यक्षाने माजी राष्ट्राध्यक्षाबाबतचा असा व्हिडीओ पोस्ट करणे हे धोकादायक मानले जात आहे. 

कोणताही राष्ट्राध्यक्ष कायद्यापेक्षा मोठा नाही, असे ओबामा सत्तेत आल्यानंतर म्हणाले होते. तो व्हिडीओ या व्हिडीओच्या सुरुवातीला जोडण्यात आला आहे. यानंतर ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत जसे बसतात तसे दाखविण्यात आले आहे, त्यांच्या शेजारी ओबामा बसलेले दाखविण्यात आले आहे. मागून तीन एफबीआय एजंट येतात आणि ओबामांच्या मानगुटीला पकडून त्यांना जमिनीवर पाडतात, यानंतर ओबामा कैद्याच्या पोशाखात तुरुंगात जात असल्याचे अखेरीस दाखविण्यात आले आहे. 

या व्हिडीओवरून अमेरिकेत गोंधळ उडाला असून अनेकांनी ट्रम्प हे एपस्टीन लीककेस पासून लोकांचे लक्ष भटकविण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. तसेच अशाप्रकारचे खोटे व्हिडीओ राष्ट्राध्यक्षाने शेअर करणे हे देशाच्या लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान, ट्रम्प हे २०१६ मध्ये निवडणूक जिंकले होते. यावेळी त्यांच्यावर निवडणुकीसाठी रशियाची मदत घेतल्याचे आरोप करण्यात आले होते. हे सर्व ओबामा यांनी खोटे रिपोर्ट बनवून माध्यमांत लीक केले असा आरोप ट्रम्प प्रशासनाचा आहे. अधिकारी आणि ओबामा यांनी मिळून हा देशद्रोह केल्याचे गुप्तचर संस्थेच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी  नुकताच केला होता. या प्रकरणाच्या नजरेतूनही ट्रम्प यांच्या या व्हिडीओकडे पाहिले जात आहे.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका