दावोस येथील वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडबद्दल एक मोठे विधान केले. 'ग्रीनलँड ही जमीन नाही तर बर्फाचा एक सुंदर तुकडा आहे, असे ते म्हणाले. ट्रम्प यांनी त्यांच्या मागील विधानाचा पुनरुच्चार केला. अमेरिकेशिवाय कोणीही ग्रीनलँडचे रक्षण करू शकत नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर ते डेन्मार्कला परत करणे ही त्यांच्या देशाची सर्वात मोठी चूक होती आणि त्या बदल्यात त्यांना फक्त कृतघ्नता मिळाली, असे विधान ट्रम्प यांनी केले.
उत्तर प्रदेशचं होणार विभाजन?; २८ जिल्हे मिळून वेगळं राज्य बनवण्याची भाजपा नेत्याची मागणी
ट्रम्प म्हणाले की, सुंदर दावोसमध्ये येऊन आनंद झाला, तिथे इतके व्यावसायिक नेते, इतके मित्र होते. ट्रम्प यांनी त्यांच्या प्रशासनात अमेरिकेत झालेल्या प्रगतीचे कौतुक केले आणि युरोप योग्य दिशेने जात नसल्याचे सांगत टीका केली.
ट्रम्प म्हणाले, "ग्रीनलँडबद्दल मी काही शब्द बोलू इच्छितो का? मी माझ्या भाषणातून ते वगळणार होतो, पण मला वाटते की मला खूप नकारात्मक प्रतिक्रिया मिळाली असती."
'अमेरिका एक महान देश'
ग्रीनलँड आणि डेन्मार्कच्या लोकांबद्दल खूप आदर आहे. युनायटेड स्टेट्सशिवाय कोणताही देश किंवा देशांचा गट ते सुरक्षित करू शकत नाही, असा दावा ट्रम्प यांनी केला.आमचा देश एक महान शक्ती आहे, लोकांच्या कल्पनांपेक्षा खूप मोठी, असंही ट्रम्प म्हणाले.
Web Summary : At Davos, Trump reiterated that only the US can protect Greenland, calling it a beautiful ice piece. He criticized Denmark's ungratefulness and emphasized America's greatness and power, asserting no other nation could safeguard Greenland.
Web Summary : दावोस में, ट्रंप ने दोहराया कि केवल अमेरिका ही ग्रीनलैंड की रक्षा कर सकता है, इसे बर्फ का एक सुंदर टुकड़ा बताया। उन्होंने डेनमार्क की कृतघ्नता की आलोचना की और अमेरिका की महानता पर जोर दिया, यह दावा करते हुए कि कोई और राष्ट्र ग्रीनलैंड की रक्षा नहीं कर सकता।