शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
2
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
3
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
4
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
5
एक एक गोष्ट बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
6
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
7
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
8
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
9
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
10
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
11
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
12
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
13
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
14
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
15
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
16
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
17
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
18
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
19
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
20
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी

नो मिन्स नो... 11 कोटी लोकांनी तंबाखू, धूम्रपान सोडले; नवी पिढी कंपन्यांच्या जाहिरातीला भुलत नसल्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 12:17 PM

वॉशिंग्टन : जगात तंबाखू सेवन करणाऱ्यांची संख्या जगभरात मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिलेल्या माहितीनुसार, ...

वॉशिंग्टन : जगात तंबाखू सेवन करणाऱ्यांची संख्या जगभरात मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिलेल्या माहितीनुसार, २००० मध्ये तीन पैकी एक व्यक्ती धूम्रपान करत होती, तर आता पाचपैकी एक व्यक्ती धूम्रपान करत आहे. आतापर्यंत जगातील तंबाखू उद्योग स्वतःच्या फायद्यासाठी जागतिक आरोग्य धोरणांवर प्रभाव टाकत आला आहे. अशात धूम्रपानात झालेली घट हे मोठे यश असल्याचे आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात म्हटले आहे.

सर्वाधिक धूम्रपानाचे प्रमाण कुठे? जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दक्षिण पूर्व आशिया आणि युरोपमध्ये धूम्रपानाचे प्रमाण सर्वाधिक आहे. येथील लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोक धूम्रपान करतात. इजिप्त, जॉर्डन आणि इंडोनेशियासारख्या काही देशांमध्ये तंबाखूचा वापर अजूनही वाढला आहे. इतर देशांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांकडे कल कमी झाला आहे. हा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने तंबाखू नियंत्रण उपायांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन सरकारांना करतो.

कंपन्या काय करतात?तंबाखूविरोधी मोहिमेवर कसा प्रभाव पडतो याचे उदाहरण पनामा येथील तंबाखू नियंत्रणावरील बैठकीत देण्यात आले. तेव्हा तंबाखू कंपन्यांनी काही देशांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढावे यासाठी तांत्रिक आणि आर्थिक मदत दिली होती.

तंबाखू नियंत्रणात चांगली प्रगती झाली आहे, परंतु समाधानकारक नाही. तंबाखू उद्योग अगणित जीव गमावून नफा कमावण्यासाठी कोणत्या थरापर्यंत जाईल हे सांगता येत नाही. - डॉ. रुएडिगर क्रेच, संचालक, डब्ल्यूएचओ 

टॅग्स :Smokingधूम्रपान