शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

“काही झाले तरी देशाच्या सुरक्षिततेशी तडजोड करणार नाही”; बांगलादेश आर्मीचा युनूस यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 11:04 IST

Bangladesh News: बांगलादेश आर्मी आणि मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असा दावाही करण्यात आला आहे.

Bangladesh News: बांगलादेशमधील हंगामी सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस हे राजीनामा देण्याचा विचार करत असल्याचे समजते. देशातील राजकीय परिस्थिती आणि त्यात सुरू असलेल्या घडामोडी यामुळे युनूस चिंतेत आहेत. अशा वातावरणात आपल्याला उत्तम काम करता येईल का, याबाबत युनूस यांना शंका असल्याचे म्हटले जात आहे. अलीकडेच युनूस यांनी देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याचे म्हटले होते. यानंतर आता बांगलादेश आर्मीने युनूस यांच्या एका प्रस्तावावर जोरदार आक्षेप घेत इशारा दिला आहे. 

ढाका येथे झालेल्या पत्रकार परिषदेत लेफ्टनंट कर्नल शफीकुल इस्लाम यांनी म्यानमारच्या राखीन प्रांतात तथाकथित कॉरिडॉर सुरू करण्याच्या अंतरिम सरकारच्या प्रस्तावावर आक्षेप घेतला आणि बांगलादेश आर्मी या प्रकरणात तडजोड करणार नाही असे सांगितले. कॉरिडॉर, राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाशी संबंधित मुद्द्यांवर आर्मी तडजोड करणार नाही. ५ ऑगस्ट २०२४ देशाच्या हितासाठी आर्मीने सर्वांशी समन्वय साधला आहे, असेही ते म्हणाले. 

देशाच्या सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही

या पत्रकार परिषदेत बोलताना ब्रिगेडियर जनरल नाझीम उद दौला म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्य, सुरक्षा किंवा सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. यावेळी पत्रकारांनी युनूस सरकार आणि आर्मीतील संघर्षाबाबत प्रश्न विचारले. यावर बोलताना, बांगलादेश आर्मी आणि मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. हा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे. सर्वांना विनंती करतो की, त्यांनी परिस्थितीचा चुकीचा अर्थ काढू नये. सरकार आणि बांगलादेश आर्मीत कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही एकत्र काम करत आहोत. प्रत्येक पावलावर एकमेकांना पूरक आहोत, असे त्यांनी नमूद केले. 

दरम्यान, बांगलादेश आर्मी आणि सरकार एकाच कुटुंबाचे भाग आहेत. मात्र, ही फूट पडण्याची चिन्हे नाहीत. ते प्रक्रियेचा भाग आहे, असेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे बांगलादेशची आर्थिक व सामाजिक स्थिती दिवसेंदिवस खालावल्याचे म्हटले जात आहे. युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या धोरणांविरोधात सामान्य नागरिक व शासकीय कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. राजधानी ढाक्याची स्थिती बिकट झाली आहे. ढाक्यात प्रामुख्याने आंदोलने होत असल्याने सरकारची चिंता वाढल्याचे सांगितले जात आहे. 

 

टॅग्स :Bangladeshबांगलादेश