शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

टाईम मॅगझीनच्या 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत एकही भारतीय नाही, ट्रम्प-युनूस यांचा समावेश; असं आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 10:38 IST

खरे तर, या यादीत दरवर्षी एका तरी भारतीयाचे नाव असते. २०२४ मध्ये, बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि ऑलिंपिक कुस्तीगीर साक्षी मलिक यांचा या यादीत समावेश होता.

टाईम मॅगझीनने जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. मात्र, यावेळी या यादीत एकाही भारतीय व्यक्तीचा समावेश नाही. या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे जवळचे उद्योगपती इलॉन मस्क यांना स्थान देण्यात आले आहे. याशिवाय, बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनाही या यादीत स्थान मिळाले आहे. खरे तर, या यादीत दरवर्षी एका तरी भारतीयाचे नाव असते. २०२४ मध्ये, बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि ऑलिंपिक कुस्तीगीर साक्षी मलिक यांचा या यादीत समावेश होता.

टाईम मॅगझिनची १०० प्रभावशाली लोकांची ही यादीही वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागलेली असते. यात नेते, आयकॉन, टायटन्स, अभिनेते आदींचा समावेश असतो. भारतीय वंशाच्या रेश्मा केवलरामणी यांना या यादीत स्थान मिळाले आहे. मात्र त्या भारतीय नागरिक नाहीत. केवलरामणी सध्या व्हर्टेक्स या औषध कंपनीच्या सीईओ आहेत. त्या जेव्हा अमेरिकेला गेल्या तेव्हा केवळ ११ वर्षांच्या होत्या. आता त्या अमेरिकेतील एका प्रसिद्ध बायोटेक्नॉलॉजी कंपनीच्या सीईओ आहेत. नेत्यांच्या यादीत ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर यांना स्थान मिळाले आहे. याशिवाय नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस, तसेच अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हेन्स यांचाही या यादीत समावेश आहे.

शी जिनपिंग आणि पुतिन यांसारख्या मोठ्या नेत्यांचाही समावेश नाही  या यादीत चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांसारख्या दिग्गजांचाही समावेश नाही. याशिवाय, फ्रान्स आणि जर्मनी सारख्या शक्तिशाली युरोपीय देशांच्या नेत्यांनाही यात स्थान देण्यात आलेले नाही. याचे कारण म्हणजे, टाईम मॅगझिनच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत केवळ अशाच नेत्यांना स्थान दिले जाते, जे अलिकडेच समोर आले आहेत आणि ज्यांच्या येण्याने समाजावर काही प्रभाव पडला आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाelon muskएलन रीव्ह मस्क