शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

हार्वर्ड विद्यापीठात दुसऱ्या देशांतील विद्यार्थ्यांना नो एन्ट्री! ट्रम्प प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 08:52 IST

Harvard University : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने एक मोठे पाऊल उचलत परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी हार्वर्ड विद्यापीठाची पात्रता रद्द केली आहे.

अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने शिक्षण क्षेत्रात मोठा निर्णय घेत, हार्वर्ड विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर थेट गदा आणली आहे. गृह सुरक्षा विभागाने अर्थात होमलँड सिक्युरिटीने(DHS) घेतलेल्या निर्णयामुळे हार्वर्ड विद्यापीठाची परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची पात्रता रद्द करण्यात आली आहे.

या निर्णयाचा मोठा परिणाम हार्वर्डमध्ये सध्या शिक्षण घेत असलेल्या अंदाजे ६८०० परदेशी विद्यार्थ्यांवर होणार आहे. यामध्ये भारतातील ७८८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. २०२४-२५ शैक्षणिक वर्षात हार्वर्डमध्ये एकूण विद्यार्थ्यांपैकी जवळपास २७ % विद्यार्थी परदेशातून आलेले होते.

७२ तासांची मुदत, सरकारकडून कडक निर्देश!

गृह सुरक्षा विभागाच्या माहितीनुसार, विद्यापीठाने ७२ तासांच्या आत सर्व परदेशी विद्यार्थ्यांची तपशीलवार माहिती अमेरिकन सरकारला द्यावी लागेल. सध्या या विद्यार्थ्यांना इतर विद्यापीठे किंवा कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यास सांगण्यात आले असून, असे न केल्यास या विद्यार्थ्यांना देश सोडावा लागू शकतो.

कारवाईमागील पार्श्वभूमीट्रम्प प्रशासनाने हा निर्णय अचानक घेतलेला नसून, गेल्या काही आठवड्यांपासून हार्वर्ड विद्यापीठ आणि ट्रम्प प्रशासन यांच्यात परदेशी विद्यार्थ्यांशी संबंधित नोंदींच्या पार्श्वभूमीवर तणाव सुरू होता. प्रशासनाने यापूर्वीच ३० एप्रिलपर्यंत परदेशी विद्यार्थ्यांच्या संभाव्य बेकायदेशीर किंवा हिंसक प्रकरणांची माहिती सादर करण्याचा इशारा दिला होता. हार्वर्डने काही प्रमाणात माहिती दिली असली, तरी ती अपुरी असल्याने सरकार नाराज होते.

DHSचा अधिकार आणि परिणाम

स्टुडंट अँड एक्सचेंज व्हिजिटर प्रोग्राम (SEVP) हे DHSच्या अखत्यारीत येते, आणि याच माध्यमातून परदेशी विद्यार्थ्यांसाठी व्हिसा प्रक्रिया पार पडते. SEVP प्रमाणपत्र रद्द झाल्यास, कोणतेही शिक्षणसंस्था परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकत नाहीत, ज्याचा थेट परिणाम हार्वर्ड विद्यापीठावर झाला आहे.

हा निर्णय उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात विशेषतः आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. पुढील काही दिवसांत हार्वर्ड विद्यापीठ आणि अमेरिकी सरकार यामध्ये यावर तोडगा निघतो की तणाव वाढतो, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पuniversityविद्यापीठEducationशिक्षण