शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

नो कॅम्प.. नो कॅम्प.., नो हंगेरी.. नो हंगेरी..!

By admin | Updated: September 5, 2015 01:01 IST

सीरियन स्थलांतरितांना आॅस्ट्रियाच्या सीमेवर सोप्रोन येथे घेऊन जाणारी रेल्वे ब्युडापेस्टपासून ४० किमी अंतरावरील बिस्क येथेच अडकून पडली आहे

बुडापेस्ट : सीरियन स्थलांतरितांना आॅस्ट्रियाच्या सीमेवर सोप्रोन येथे घेऊन जाणारी रेल्वे ब्युडापेस्टपासून ४० किमी अंतरावरील बिस्क येथेच अडकून पडली आहे. काल (गुरुवारी) दुपारी बिस्कमधील शरणार्थी शिबिरामध्ये जाण्याची सूचना करूनही स्थलांतरितांनी रेल्वे न सोडण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण रात्र रेल्वेमध्ये काढावी लागली तरीही या लोकांनी रेल्वे सोडणार नाही, असे ठामपणे सांगितले आहे. आमच्याकडे तिकिटे आहेत. आम्हाला जर्मनीला जाऊ द्या, असे सांगत त्यांनी ‘नो कॅम्प, नो हंगेरी’ अशा घोषणा देणे सुरू केले आहे. या रेल्वेमध्ये कोणत्याही खाण्या-पिण्याच्या सोयीही नाहीत; तरीसुद्धा स्थलांतरितांनी आता शिबिरात जाणार नाही, असे सांगितले आहे. दरम्यान कॉस बेटांवरती चर्चेसाठी गेलेल्या युरोपियन कमिशनच्या अधिकाऱ्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.‘ईयू’कडे लक्षआरोप-प्रत्यारोपांपेक्षा चर्चेनेच सुटेल हे वास्तव लक्षात आल्यामुळे ब्रुसेल्समध्ये युरोपियन युनियन तोडगा काढेल अशी आशा वाटत आहे. आयलानच्या मृत्यूनंतर युरोपिय महासंघ स्थलांतरावर नवा फॉर्म्युला आणेल असे सांगण्यात येत आहे. युरोपियन कमिशनचे अध्यक्ष जीन क्लाउड यांनी पुनर्विभागणीच्या नव्या आराखड्यानुसार इटली, ग्रीस आणि हंगेरीसारख्या देशांवर आलेला ताण विभागला जाईल, असे सांगितले; तर युरोपियन युनियनचे अध्यक्ष डोनल्ड टस्क यांनी १ लाख लोकांना सामावून घेण्याची विनंती सर्व सदस्य देशांना केली आहे. लक्झेंबर्ग येथे होणाऱ्या सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत काय होते ते महत्त्वाचे ठरणार आहे.अँटी इमिग्रेशन कायदाहंगेरीच्या संसदेने या परिस्थितीवर दिवसभर चर्चा केली. यावेळेस अँटी इमिग्रेशन कायदा मांडला गेला. सीमेवरील तारेचे कुंपण ओलांडणाऱ्यास तीन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे.तीन वर्षांच्या आयलान कुर्दीच्या फोटोंमुळे काल संपूर्ण जग हेलावले. संपूर्ण जगाचे लक्ष आयलानच्या छायाचित्राद्वारे वेधणाऱ्या दोगन न्यूज एजन्सी या तुर्की वृत्तसंस्थेसाठी काम करणाऱ्या निलुफर दामिर या महिला छायाचित्रकाराने आज आपल्या भावना व्यक्त केल्या. तुर्कस्थानच्या बोडरम किनाऱ्यावर फिरताना जेव्हा मी आयलानचा मृतदेह पाहिला तेव्हा मी जागच्या जागी थिजून गेले. माझ्या लक्षात आले की काहीही करण्यासारखे शिल्लक राहिलेले नाही. मी केवळ त्या मृत आयलानच्या वेदनेची किंकाळी फोटोंमधून व्यक्त केली.. असे सांगताना निलुफरला भावना आवरता आल्या नाहीत.हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ओर्बन यांनी आपली भूमिका अद्याप कायम ठेवली आहे. इतक्या मोठ्या संख्येने मुस्लीम लोकसंख्येला स्वीकारायचे की नाही हे ठरविण्याचा अधिकार आम्हाला आहे. बहुसंख्येने मुस्लीमधर्मीय असणाऱ्या देशाप्रमाणे कोणत्याही परिणामांना आम्हाला सामोरे जायचे नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी आपला प्रखर विरोध व्यक्त केला आहे. तुम्हा सीरियन लोकांना तुर्कस्थान जवळ आहे व ती सुरक्षित जागा आहे, तुम्ही तिकडे जा, हंगेरीत येऊ नका, असेही त्यांनी या वेळेस सांगून टाकले. हा प्रश्न जर्मनीचा आहे, जर्मनीने त्यावर तोडगा काढावा, अशी वक्तव्ये ओर्बन यांनी केल्याने युरोपात खळबळ माजली आहे.नैतिक बंधन पाळू शरणार्थींच्या बाबतीत ब्रिटनने थोडीशी नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांनी नैतिक बंधनांचे आम्ही पालन करू, असे सांगत आणखी काही हजार शरणार्थींना स्वीकारण्यास तयारी दर्शविली आहे. व्हल्नरेबल पर्सन्स रिलोकेशन स्कीम अंतर्गत अधिक शरणार्थींना कसे सामावून घेता येईल याचा विचार सुरू आहे.हे तर स्मशानच आयलान कुर्दीच्या मृत्यूमुळे तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष रेसिप तय्यीप एर्दोगान यांनी दु:ख व्यक्त केले आहे. भूमध्य समुद्राचे स्मशानच झाले आहे, असे सांगून ज्या वेळी मी आयलान कुर्दीचे छायाचित्र पाहिले त्या वेळी दुर्दैवाने माझे कुटुंबीय आणि मुलेही माझ्याजवळ होती.. आमच्यावर त्याचा परिणाम झाला, अशा संवेदना त्यांनी व्यक्त केल्या.द फ्रिडम ट्रेन चोविस तासांपेक्षाही अधिक काळ ट्रेनमध्ये राहिलेल्या सीरियन नागरिकांनी आत बसूनही घोषणाबाजी सुरुच ठेवली आहे. बातम्या देणाऱ्या स्थानिक व आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या प्रतिनिंधींना ‘मीडिया, मीडिया, डोंट लीव्ह’ अशा हाकाही त्यांनी यावेळेस मारल्या.व ट्रेनला फ्रिडम ट्रेन असे म्हणण्यास ुसुरुवात केली आहे. संयुक्त राष्ट्राची टीकासंयुक्त राष्ट्राच्या सेक्रेटरी जनरल यांच्या स्थलांतराविषयीच्या विशेष प्रतिनिधी पीटर सदरलँड यांनी युरोपियन युनियनच्या सदस्यांवर टीका केली आहे. या देशांनी आपापल्या जबाबदारी वाटा उचलला असता तर स्थलांतरितांना या परिस्थितीत राहावे लागले नसते अशा शब्दांमध्ये त्यांनी टीका केली आहे.