शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

‘प्लुटो’च्या पाच चंद्रांचे नयनरम्य नृत्य

By admin | Updated: June 4, 2015 23:30 IST

प्लुटो व त्याचे पाच चंद्र ही सूर्यमालेच्या टोकाची आणखी एक ग्रहमाला असून, हे पाच चंद्र एकमेकांशी टक्कर घेत असल्याचे अनोखे दृश्य अंतराळवीरांनी पाहिले आहे.

न्यूयॉर्क : प्लुटो व त्याचे पाच चंद्र ही सूर्यमालेच्या टोकाची आणखी एक ग्रहमाला असून, हे पाच चंद्र एकमेकांशी टक्कर घेत असल्याचे अनोखे दृश्य अंतराळवीरांनी पाहिले आहे. प्लुटोचा सर्वांत मोठा चंद्र चॅरॉन आहे. ७५० मैल रुंदी असणाऱ्या या उपग्रहाचा शोध १९७८ साली लागला आहे. या चंद्राचे वस्तुमान (मास) मूळ ग्रह प्लुटोच्या एक नवमांश इतके आहे. त्यामुळे हे ग्रह जेव्हा जवळ येतात, तेव्हा प्लुटो आणि चॅरॉन हे डबल ग्रह असल्याप्रमाणे दिसते. या जुळ्या ग्रहांचे नृत्य चालल्याचा भास अवकाशात होतो, असे हा अभ्यास करणाऱ्या मार्क शोवॉल्टर यांचे म्हणणे आहे. शोवॉल्टर कॅलिफोर्निया येथील सेटी इन्स्टिट्यूटमध्ये काम करतात. तांत्रिकदृष्ट्या चॅरॉन हा काही ग्रह नाही. तसेच प्लुटोहाही पूर्ण ग्रह मानले जात नाही; पण प्लुटोच्या या ग्रहमालेत केवळ चॅरॉन आणि प्लुटो दोघेच नाहीत. प्लुटो व चॅरान या दोन ग्रहांना प्लुटोचे आणखी चार छोटे चंद्र वेढा घालतात. कधी त्यातील दोन चंद्र एकमेकांजवळ ओढले जातात, तर कधी त्यातील एक चंद्र चॅरॉन व प्लुटो या जोडगोळीकडे ओढला जातो. या गडबडीत प्लुटो वचॅरॉन हेही एकमेकांपासून दूर जातात वा जवळ येतात. प्लुटो, चॅरॉन व चार चंद्र यांचे हे फिरणे नियामानुसारच आहे; पण जेव्हा हे चंद्र एकमेकांजवळ येतात, तेव्हा एकमेकांकडे ओढले जातात. त्यामुळे यांचे नृत्य चालल्याचा भास होतो. या ग्रहांची संगीत मैफल चालल्याप्रमाणे वाटते, असे ग्रहशास्त्रज्ञ हैदी हामेल यांनी म्हटले आहे. नासाचे ७०० दशलक्ष डॉलर किमतीचे न्यूहोरायझन हे यान प्लुटोवर जुलै महिन्याच्या मध्यात उतरणार आहे. प्लुटोवर पोहोचण्यासाठी या यानाने ९ वर्षे प्रवास केला आहे. (वृत्तसंस्था)४प्लुटोच्या छोट्या चंद्रांचा शोध २००५ साली हबल दुर्बिणीने घेतलेल्या छायाचित्रावरून लागला आहे. त्यांची नावे निक्स व हैड्रा अशी आहेत. २०११ साली आणखी एक चंद्र सापडला असून त्याचे नाव करबरोस, असे ठेवण्यात आले आहे. करबरोस हा चंद्र निक्स व हैड्रा यांच्या मधल्या कक्षेत आहे. २०१२ साली प्लुटोचा पाचवा चंद्र सापडला असून त्याचे नाव स्टिक्स असे ठेवण्यात आले आहे. ४गुरुत्वाकर्षणाच्या खेळात जेव्हा निक्स प्लुटोकडे ओढला जातो तेव्हा चॅरॉन त्याच्या शेजारून नेहमीची प्रदक्षिणा पूर्ण करताना दिसतो; पण त्याची ही प्रदक्षिणा म्हणजे नृत्य असा आभास होतो. निक्स जेव्हा प्लुटोकडे ओढला जातो तेव्हा त्याचे ध्रुवही बदलातात. तिथे मग सूर्य उगवतो पूर्वेला पण मावळतो उत्तरेला.