केरळमधील परिचारिका नर्स निमिषा प्रिया हिच्या येमेनमध्ये अडचणी वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी १६ जुलै रोजी निमिषा हिला फाशी देण्यात येणार होती, पण भारतातील एका मुस्लिम धर्मगुरूच्या हस्तक्षेपानंतर ही शिक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. पण, आता या प्रकरणात आणखी एक नवीन अपडेट आली आहे. तिच्या अडचणी वाढणार आहेत.
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
येमेनी नागरिकाच्या हत्येसाठी निमिषा हिला फाशी देण्यात येणार आहे तिच्या भावाने पत्र लिहून तिला लवकरात लवकर मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्याची मागणी केली आहे. मृताच्या भावाने पत्र लिहून ही मागणी केली. हे कुटुंब कोणत्याही प्रकारच्या समेटासाठी किंवा तडजोडीसाठी तयार नसल्याचे समोर आले.
हे प्रकरण कधीचे आहे?
२०१७ च्या एका प्रकरणात निमिषा प्रियाला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामध्ये तिने चुकून तलाल अब्दु महदी या येमेनी नागरिकाची हत्या केली होती. महदीचा भाऊ अब्दुल फताह अब्दु महदीने ३ ऑगस्ट रोजी येमेनचे अॅटर्नी जनरल आणि न्यायाधीश अब्दुल सलाम अल-हूथी यांना एक पत्र लिहिले आणि ते सोशल मीडियावर शेअर केले.
आपल्या पत्रात अब्दु महदीने लिहिले की, निमिषा प्रियाला फाशी द्यावी अशी त्यांच्या कुटुंबाची इच्छा आहे. मूळ अरबी भाषेत लिहिलेल्या या पत्रात त्यांनी लिहिले आहे की, "१६ जुलै रोजी फाशीची शिक्षा पुढे ढकलून अर्ध्या महिन्याहून अधिक काळ लोटला आहे आणि फाशीची नवीन तारीख निश्चित केलेली नाही. आम्ही, पीडितेचे वारस, सूडाची शिक्षा लागू करण्याच्या आमच्या कायदेशीर अधिकाराचे पूर्णपणे पालन करतो आणि समेट किंवा मध्यस्थीच्या सर्व प्रयत्नांना नकार देतो."
पत्र लिहून मृताच्या भावाने फाशीची शिक्षा लागू करावी आणि फाशीची नवीन तारीख निश्चित करावी अशी मागणी केली आहे. फाशीची शिक्षा हक्कांचे रक्षण करेल आणि न्याय देईल,असंही पत्रात म्हटले आहे.