शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

New Zealand PM Jacinda Ardern: न्यूझीलंडच्या पंतप्रधान पुन्हा चर्चेत; जेसिंडा अर्डर्ननी स्वत:चे लग्नच रद्द केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 10:44 IST

New Zealand PM Jacinda Ardern Wedding: न्यूझीलंडमध्ये रविवारी रात्रीपासून मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत. याशिवाय मेळाव्यावर बंदी घालण्यात आली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णसंख्या शून्यावर नेणाऱ्या, जगातील पहिला देश ठरलेल्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नवीन निर्बंध लावण्यात आले आहेत. यामध्ये लग्न समारंभ देखील रद्द करण्याचे निर्बंध आहेत. यामुळे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी स्वत:चे लग्न देखील रद्द केले आहे.

न्यूझीलंडमध्ये रविवारी रात्रीपासून मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत. याशिवाय मेळाव्यावर बंदी घालण्यात आली आहे. कार्यक्रमाला केवळ मर्यादित लोकच उपस्थित राहू शकणार आहेत. न्यूझीलंडमध्ये एका लग्न समारंभानंतर ओमायक्रॉनचे ९ रुग्ण सापडले होते. यानंतर तिथे कम्युनिटी स्प्रेडचा धोका होता. एक कुटुंब ऑकलंडहून लग्न समारंभाला जाऊन विमानाने साऊथ आयलंडवर आले होते. या कुटुंबासह फ्लाईट अटेंडंट कोरोना बाधित सापडला. यानंतर न्यूझीलंडमध्ये निर्बंधांची घोषणा करण्यात आली. 

नवीन निर्बंधांनुसार, बार आणि रेस्टॉरंट्स आणि लग्नासारख्या कार्यक्रमांमध्ये 100 लोकांना परवानगी आहे. याशिवाय कार्यक्रमस्थळी लस घेतली नसेल केवळ २५ लोकच उपस्थित राहू शकतात. याशिवाय मार्च 2020 पासून न्यूझीलंडमध्ये परदेशी नागरिकांसाठी सीमा बंद आहेत. ओमिक्रॉनचे रुग्ण पाहता सरकारने सीमा उघडण्याचा निर्णय पुढे नेला आहे. न्यूझीलंडमध्ये, 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकसंख्येपैकी 94% लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. याशिवाय, 56% लोकसंख्येला बूस्टर डोस देखील मिळाला आहे.

अर्डर्न या 2017 मध्ये न्यूझीलंडच्या सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान झाल्या. त्यांनी आपल्या मजूर पक्षाला सर्वात मोठा विजय मिळवून दिला. जॅसिंडा अर्डर्न त्यांचा मित्र क्लार्क गेफोर्डसोबत लग्न करणार आहेत. 40 वर्षीय पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांची 2019 मध्ये टीव्ही होस्ट  असलेल्या गेफोर्डशी ओळख झाली होती. 

टॅग्स :New Zealandन्यूझीलंडcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन