शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

New Zealand मध्ये कोरोनाचे तीन नवे रुग्ण, मोठ्या शहरात पुन्हा लॉकडाऊन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 20:52 IST

New Zealand : एकाच कुटुंबातील तीन जणांना कोरोनाची लागण झाल्यानं खबरदारी म्हणून लागू करण्यात आला लॉकडाऊन. पंतप्रधानांचे दौरे रद्द, माहिती घेण्यासाठी परतल्या राजधानीत

ठळक मुद्देएकाच कुटुंबातील तीन जणांना कोरोनाची लागण पंतप्रधानांनी सर्व दौरे केले रद्द

कोरोना विषाणूनं अनेक देशांमध्ये हाहाकार माजवला होता. परंतु न्यूझीलंडला कोरोनापासून दूर राहण्यात यश आलं होतं. परंतु आता न्यूझीलंडमध्येही पुन्हा एकदा तीन नवे रुग्ण सापडले आहेत. यानंतर न्यूझीलंडच्या सरकारनं न्यूझीलंडमधील सर्वात मोठ्या शहरात तीन दिवसांचा लॉकाडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून हा लॉकडाऊन लागू होणार आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांची कॅबिनेटच्या मंत्र्यांसोबत बैठक पार पडली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. "कोरोना विषाणूच्या नव्या रुग्णांबद्दल जोवर पूर्णपणे माहिती मिळत नाही तोवर आपण सतर्क राहणार आहोत. तसंच आता रुग्णांमध्ये सापडलेला कोरोना विषाणू यापूर्वीच्या कोरोना विषाणूपेक्षा अधिक संक्रमण करणारा आहे का? याचीही माहिती घेतली जात आहे," असं जेसिंडा आर्डन म्हणाल्या. देशाच्या इतर भागांमध्येही काही प्रतिबंध कायम ठेवले जाणार आहेत. तसंच ऑकलंड व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लावावा लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं आर्डन यांनी नमूद केलं. दरम्यान, रविवारी एकाच कुटुंबातील तीन जणांना कोरोनाचं संक्रमण झाल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती न्यूझीलंडच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली. जेसिंडा आर्डन यांनीदेखील आपले अन्य दौरे रद्द केले असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास त्या वेलिंग्टनला परतल्या आहेत. इतर देशांच्या तुलनेत न्यूझीलंडनं यापूर्वी कोरोनाचा सामना उत्तमरित्या केला होता. परंतु आता न्यूझीलंडमध्ये येणाऱ्या अनेकांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली आहे. अशा परिस्थितीत लोकांना न्यूझीलंडमध्ये पहिले दोन आठवडे क्वारंटाईन व्हावं लागतं. "इतर देशांच्या तुलनेत न्यूझीलंड कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आपल्या देशात परसण्यापासून रोखण्यात यशस्वी झाला आहे. परंतु अद्यापही नो रिस्क सारखी कोणतीही स्थिती नाही," अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडमध्ये कोरोना विषाणूशी निगडीत कोविड १९ रेस्पोन्स मिनिस्टर क्रिस हिपकिंस यांनी दिली.

टॅग्स :New Zealandन्यूझीलंडprime ministerपंतप्रधानcorona virusकोरोना वायरस बातम्या