शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

नव्या कोरोनामुळे जग धास्तावले; जगभरातील अनेक देशांनी रोखली ब्रिटनहून येणारी विमान वाहतूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 05:42 IST

new corona : नवअवतारित विषाणूचा अधिक जोमाने उद्रेक होत असल्याचे आढळून येताच इंग्लंडसह संपूर्ण युरोपात भीतीची लाट पसरली.

लंडन/नवी दिल्ली : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाला अलविदा करून नव्या वर्षात दणक्यात प्रवेश करण्याचे बेत नाताळच्या पार्श्वभूमीवर आखले जात असतानाच इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवअवतारित विषाणू झपाट्याने पसरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये हाहाकार उडाला असून अनेकांनी रेल्वे व विमानतळांवर गर्दी केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतासह बहुतेक देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या सर्व विमानांची वाहतूक रोखली आहे. दरम्यान, ‘व्हीयूआय-२०२०१२/०१’ असे नामकरण असलेला कोरोनाचा नवअवतारित विषाणू मूळ कोरोना विषाणूपेक्षा ७० टक्के अधिक घातक असल्याचे समजते.

नवअवतारित विषाणूचा अधिक जोमाने उद्रेक होत असल्याचे आढळून येताच इंग्लंडसह संपूर्ण युरोपात भीतीची लाट पसरली. सर्व युरोपीय देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांना बंदी घातली आहे. भारतानेही २२ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. मात्र, ही बंदी लागू होण्याच्या आधीच भारताच्या दिशेने प्रवास करत असलेल्या विमान प्रवाशांना संबंधित विमानतळावर ‘आरटी-सीपीआर’चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. त्यातील कोरोनाबाधितांना विलगीकरणात ठेवले जाईल, तसेच जे कोरोनाबाधित नसतील, त्यांना सात दिवस घरातच राहाण्यास सांगितले जाईल.

केंद्र सरकार यासंदर्भात पूर्णपणे जागरूक : इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळून आला असला तरी त्यामुळे देशवासीयांनी घाबरून जाण्याची गरज नाही. केंद्र सरकार यासंदर्भात पूर्णपणे जागरूक असून तातडीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे.    - डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय आरोग्यमंत्री.

नव्या विषाणूमुळे झपाट्याने वाढतेय संख्या : कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे बाधा झालेल्यांची संख्या खूपच झपाट्याने वाढत आहे. या उद्रेकाला आळा घालण्यासाठी बराच कालावधी लागेल. नवीन लस येईपर्यंत या नव्या विषाणूला अटकाव करण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे.     - मॅट हँकॉक, इंग्लंडचे आरोग्यमंत्री

सर्वत्र घबराटकोरोनाच्या नव्या विषाणूने थैमान घातले असल्याचे समजताच इंग्लंडमधील अनेक मोठ्या शहरांतील नागरिकांनी रेल्वे स्थानके व विमातळाकडे धाव घेतली. त्यामुळे सर्वत्र गर्दी दिसत होती. इंग्लंडमध्ये जारी करण्यात आलेल्या नव्या टाळेबंदीमुळे एक कोटी ६० लाख नागरिकांना घरातच राहावे लागणार आहे.

नाताळचे कार्यक्रम रद्दकोरोनाच्या नव्या विषाणूच्या संसर्गाचा वेग पूर्वीपेक्षा ७० टक्के जास्त असून, त्यामुळे इंग्लंडमधील नाताळचे सर्व कार्यक्रम रद्द केल्याची घोषणा पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केली. इंग्लंडमध्ये कोरोना लस पुरेशा संख्येने उपलब्ध होत नाही, तोवर कडक निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता, इतर सर्व प्रकारची दुकाने सध्या बंद ठेवण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे. 

युराेपीयन युनियनची लसीला सशर्त मान्यतायुराेपीयन युनियनच्या औषध नियंत्रकांनी ‘फायझर’च्या लसीला सशर्त मान्यता दिली आहे. ही लस १६ वर्षांवरील व्यक्तींनाच देण्यात यावी, असे औषधी संस्थेने म्हटले आहे. 

जगभरात काय पडसाद?- फ्रान्स, जर्मनी, इटली, स्वित्झर्लंड, पोर्तुगाल, बेल्जियम, ऑस्ट्रिया, बल्गेरिया, डेन्मार्क, फिनलँड, रोमानिया, क्रोएशिया आणि नेदरलँड यांच्याकडून इंग्लंडच्या विमानांना प्रवेशबंदी

- चीननंतर आता ब्रिटनची जगाला धास्ती वाटू लागली आहे. 

- इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड येथून येणाऱ्या विमानांवर तुर्कस्तानकडून अनिश्चित काळापर्यंत बंदी

- कॅनडा, आयर्लंड आणि चिली यांच्यांकडूनही इंग्लंडकडे जाणाऱ्या व तेथून येणाऱ्या विमानांना अटकाव

- ब्रिटनहून येणाऱ्या विमानांना जॉर्डनकडून ३ जानेवारीपर्यंत बंदी

- रशियाकडून २९ डिसेंबरपर्यंत हवाईबंदी

- सौदी अरेबियाने सर्व सीमा पुढील एक आठवड्यासाठी सीलबंद केल्या आहेत. युरोपीय देशातून आलेल्यांना दोन आठवडे स्व-विलगीकरण करावे लागणार आहे.

विषाणूचे नवे रूप किती धोकादायक?  वर्षभर जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा नवा अवतार आता वर्ष संपत असताना ब्रिटनमध्ये आढळला आहे. कोरोनाच्या या नव्या अवताराला ‘व्हीयूआय-२०२०१२/०१’ (डिसेंबर, २०२० मध्ये आढळलेला पहिला अवतार जो तपासाधीन आहे) असे प्रयोगशालेय नाव देण्यात आले आहे. नाव काहीही असो, परंतु कोरोनाच्या या नव्या अवताराने ब्रिटनमध्ये हाहाकार माजवला आहे. लवकरच तो युरोपात हातपाय पसरेल, अशी भीती आहे. जाणून घेऊ या कोरोनाच्या या नव्या अवताराविषयी...

ब्रिटनमध्ये कुठून आला या विषाणूचा नवा अवतार?इंग्लंडमध्ये आतापर्यंत या नव्या कोरोना विषाणूची लागण झालेले ११०० हून अधिक बाधित आढळले आले आहेत. सुरुवातीला इंग्लंडच्या नैऋत्येला या विषाणूचे बाधित मोठ्या संख्यने सापडलेे. आता वेल्स आणि स्कॉटलंड येथेही नव्या विषाणूचे बाधित आढळू लागले आहेत. सप्टेंबरच्या अखेरीस कोरोनाच्या नव्या अवताराचे अस्तित्व दिसून आले. त्याचे आता नॉरफ्लॉक येथे २० टक्के, ईसेक्स परगण्यात १० टक्के आणि सफ्लॉक येथे ३ टक्के रुग्ण आढळले आहेत. हा नवा अवतार परदेशातून इंग्लंडात आला असावा, असा कयास आहे. 

याचा शोध कसा लागला?इंग्लंडमध्ये आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या नमुन्यांचे परीक्षण करत असताना ‘कोविड १९ जिनोमिक्स यूके (सीओजी-यूके) कॉन्सर्शिअम’ या संस्थेतील संशोधकांना कोरोनाच्या या नव्या अवताराचा शोध लागला. ही संस्था इंग्लंडच्या सार्वजनिक आरोग्य संस्थांशी निगडित आहे. 

 हा झपाट्याने पसरतो का?नक्की काही सांगता येऊ शकत नाही, असे इंग्लंडच्या आरोग्यमंत्र्यांचे - मॅट हँकॉक यांचे  म्हणणे आहे. इंग्लंडमध्ये अलीकडेच मोठ्या संख्येने बाधित वाढले. कदाचित त्याचा संबंध कोरोनाच्या या नव्या अवताराशी असू शकेल, असे हँकॉक म्हणतात.

 उत्परिवर्तन होणे शक्य आहे?सार्स-सीओव्ही-२ हा आरएनए विषाणू आहे. त्यामुळे नैसर्गिकरीत्या त्याचे उत्परिवर्तन होणे शक्य आहे. त्याचे आतापर्यंत हजारो उत्परिवर्तने झाली आहेत. मात्र, त्यातले अगदी मोजकेच मूळ विषाणूपेक्षा निराळे असतात. त्यामुळे त्यांचे गुणधर्म वेगळे असतात. 

 हा अधिक धोकादायक आहे का?अद्याप तरी याची काही कल्पना नाही. प्रत्येक वेळी उत्परिवर्तित विषाणू मूळ विषाणूपेक्षा अधिक धोकादायक असेलच असे नाही. उदाहरणार्थ डी६१४जी हा नवअवतारित विषाणू सहजगतीने दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करू शकण्याची क्षमता राखून होता. ते आता इंग्लंडमध्ये दिसून येत आहे. नव्या अवताराबाबत अजून तरी काही अशी वैशिष्ट्ये हाती लागलेली नाहीत. 

 आताच्या लसींचे काय?कोरोनाच्या नव्या विषाणूत उद्रेक वाढविण्याचे उपद्रवमूल्य आहे. या उद्रेकाला अटकाव करण्याचेच सद्यस्थितीतील लसींचे मुख्य उद्दिष्ट आहे. लसीमुळे शरीरात रोगप्रतिकारकक्षमतेची वाढ होत असल्याने विषाणूतील एका बदलामुळे त्या परिणामकारक ठरणार नाहीत, असे म्हणणे अगदीच चुकीचे ठरेल. त्यामुळे लसी परिणामकारक ठरतील, अशी आशा संशोधक व्यक्त करत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या