शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

तैवानमधील विमान अपघातामुळे नेताजींचा मृत्यू

By admin | Updated: January 17, 2016 02:03 IST

तैवानमध्ये झालेल्या एका विमान अपघातात जखमी होऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाल्याचा दावा काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा हवाला देऊन एका ब्रिटिश वेबसाईटने केला आहे.

लंडन : तैवानमध्ये झालेल्या एका विमान अपघातात जखमी होऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाल्याचा दावा काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा हवाला देऊन एका ब्रिटिश वेबसाईटने केला आहे.‘डब्ल्यू डॉट डब्ल्यू डॉट डब्ल्यू बोस फाईल्स डॉट इंफो’ ही ब्रिटिश वेबसाईट नेताजींचे रहस्यमय बेपत्ता होण्यामागचे कारण शोधून काढण्याचे प्रयत्न करीत आहे. १८ आॅगस्ट १९४५ रोजी तैवानची राजधानी तैपेयीच्या विमानतळाबाहेरील बाजूला झालेल्या विमान अपघातात ‘इंडियन नॅशनल आर्मी’च्या या संस्थापकाचा मृत्यू झाला, असे पाच साक्षीदारांचा हवाला देऊन वेबसाईटने म्हटले आहे. या पाच साक्षीदारांत नेताजींचा एक निकटचा सहकारी, दोन जपानी डॉक्टर, एक दुभाषी आणि एक तैवानी नर्स यांचा समावेश आहे.बोस त्यांचे एक सहायक कर्नल हबीबूर रहमान यांना ‘मृत्यूपूर्वी म्हणाले की, ‘त्यांचा (बोस यांचा) अंत समीप असून, मी भारताच्या स्वातंत्र्यासाठी शेवटपर्यंत लढलो आणि प्रयत्नातून मी बलिदान देत आहे’, असा संदेश देशवासीयांना द्या. जपानी सदर्न आर्मीचे ‘चीफ आॅफ स्टाफ’कडून हिकारी किकानला पाठविण्यात आलेल्या एका टेलिग्रामचीही प्रत मिळाली होती. जपान सरकार आणि बोस यांचे ‘अंतरिम स्वतंत्रता भारत सरकार’ यांच्यात हिकारी किकान एक संपर्क सेतू म्हणून काम करीत होती. २० आॅगस्ट १९४५ च्या या केबलमध्ये बोस यांच्यासाठी ‘टी’ शब्दाचा वापर करून म्हटले आहे की, १८ तारखेला ‘टी’ राजधानी टोक्योला परतत असताना ताईहोकू (तैपेयीचे जपानी नाव) येथे विमान अपघातात गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी रात्रीच त्यांचा मृत्यू झाला. (वृत्तसंस्था)मे-जुलै १९४६ मध्ये ब्रिटिश लष्करातील लेफ्टनंट कर्नल जे.जी. फिग्गेस यांनी या अपघाताबाबत जपानी डॉक्टर तोयोशी सुरुनासह सहा जपानी अधिकाऱ्यांसोबत विचारपूस केली होती. त्यावेळी सुरुना दुर्घटना स्थळापासून जवळच असलेल्या नानमोन लष्करी इस्पितळात होते. याच इस्पितळात बोस यांना आणण्यात आले होते. डॉ. सुरुना यांनी फिग्गेस यांना सांगितले की, आपण रात्रभर माझ्याजवळ बसून राहाल काय, अशी विचारणा बोस यांनी माझ्याकडे केली होती, पण सायंकाळी ७ नंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडत गेली. डॉक्टरांनी त्यांना पुन्हा एकदा इंजेक्शन दिले, पण ते कोमात गेले. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांचा मृत्यू झाला.