शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही सैन्य मागे घेणार ही निव्वळ अफवा - चिनी परराष्ट्र खाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 12:55 IST

भारताशी तडजोडीची भूमिका स्वीकारण्यात येत असून चिनी सैन्य मागे घेण्यात येईल या निव्वळ अफवा असल्याचा खुलासा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.

ठळक मुद्देचीन आपल्या प्रादेशिक हक्कांविषयी कधीही तडजोड करणार नाही अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहेभारतानेच चीनच्या हद्दीत घुसखोरी केल्याचा दावा चिनी परराष्ट्र खात्याने केला आहे.दोन्ही देशांनी सैन्य मागे घ्यावे आणि चर्चा करावी अशी भारताची भूमिका असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे

बीजिंग, दि. 11 - भारताशी तडजोडीची भूमिका स्वीकारण्यात येत असून चिनी सैन्य मागे घेण्यात येईल या निव्वळ अफवा असल्याचा खुलासा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. चीन आपले सैन्य 100 मीटरपर्यंत मागे घेण्यास राजी झाल्याचे वृत्त अत्यंत चुकीचे असल्याचे परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. चीन 100 मीटर मागे हटण्यास तयार असून भारताने मात्र चिनी सैन्य 250 मीटर मागे न्यावे अशी मागणी केल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले होते. चायना डेलीने दिलेल्या वृत्तानुसार हे वृत्त निराधार असून चीन आपल्या प्रादेशिक हक्कांविषयी कधीही तडजोड करणार नाही अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे. या संदर्भातली चीनची भूमिका अत्यंत स्पष्ट आणि ठाम असल्याचा दावा या प्रवक्त्याने केला आहे. भारताने विनाअट आपले या भागात आणलेले सैन्य मागे घ्यावे अशी मागणीही चिनी प्रवक्त्याने चायना डेलीशी बोलताना केली आहे.चीन भारताच्या अवास्तव मागण्या कधीही मान्य करणार नाही अशी दर्पोक्तीही करण्यात आली आहे. भारतानेच चीनच्या हद्दीत घुसखोरी केल्याचा दावा चिनी परराष्ट्र खात्याने केला आहे. चीनने या संदर्भात भूतानच्या स्वातंत्र्याबद्दल तसेच प्रादेशिक हक्काबाबतही प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, भूतानने चीनचा दावा खोडताना भारताच्या दाव्याशी अनुकूल मत व्यक्त केले होते. चीन रस्त्याचे करत असलेले काम हे भूतानच्या हद्दीत असून ते चीनने भूतानशी केलेल्या कराराच्या विपरीत असल्याची भूमिका भारताने मांडली आहे. तसेच, या रस्त्यामुळे या भागातल्या सुरक्षा व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचेही भारताने म्हटले आहे.दोन्ही देशांनी सैन्य मागे घ्यावे आणि चर्चा करावी अशी भारताची भूमिका असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. जूनमध्ये हा पेचप्रसंग निर्माण झाला असून भारत व चीनचे सैन्य सिक्कीम, भूतान व चीन या तिघांचा संगम होत असलेल्या डोकलाम भागात समोरासमोर ठाकले आहे.