शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 16:04 IST

नेपाळ सध्या राजकीय संकटाचा सामना करत आहे, देशभरात जाळपोळ सुरू आहे. दरम्यान, लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्देल यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यांनी भारत आणि चीनमध्ये लष्करी शिक्षण घेतले आहे.

नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. मंत्र्यांच्या निवासस्थानांची जाळपोळ केली असून संसदेवरही हल्ला केला आहे. तीन दिवसानंतरही तेथील परिस्थिती अजूनही सुधारत नाही. सरकारविरोधी निदर्शनांच्या नावाखाली, गुन्हेगारांना संधी मिळाली आहे. सध्या राजकीय संकटाचा सामना करत आहे. दरम्यान,  लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिगदेल यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.  ते विभाजित नेपाळला एकजूट ठेवू शकतात. 

त्रिभुवन विद्यापीठातून एमए केलेले अशोक राज सिगदेल यांनी भारत आणि चीनच्या लष्करी कार्यक्रमांमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी चीनच्या राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठातून स्ट्रॅटेजिक स्टडीजमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी नेपाळ, भारत आणि चीनमध्ये सघन लष्करी प्रशिक्षण घेतले आहे.

नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले

सिग्देल यांनी सिकंदराबाद, भारतातील कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंटमधून संरक्षण व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. नेपाळमधील नगरकोट आणि आर्मी कमांडमधील प्रगत अभ्यासक्रमांमुळे त्यांचे व्यावसायिक लष्करी शिक्षण बळकट झाले. 

ओली यांच्या राजीनाम्यानंतर लष्कराने सत्ता हाती घेतली

८ सप्टेंबर रोजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर नेपाळमध्ये सत्तेची पोकळी निर्माण झाली. त्यानंतर लष्कराने कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी स्वीकारली. लष्करप्रमुखांनी विद्यार्थ्यांना शांततेचे आवाहन केले.

त्यांनी तरुण निदर्शकांना हिंसाचार सोडून चर्चेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी आवाहन केले. पुढील रक्तपात रोखण्यासाठी लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिगदेल यांनी स्वतः ओली यांना पदावरून पायउतार होण्याचा सल्ला दिला होता.

लष्करी राजदूताची भूमिका

त्यांच्या जवळजवळ चार दशकांच्या कारकिर्दीत, अशोक राज सिगदेल यांनी बटालियन, ब्रिगेड आणि डिव्हिजनचे कमांडिंग करण्याव्यतिरिक्त लष्करी ऑपरेशन्स संचालक म्हणून काम केले आहे. २०१९ मध्ये त्यांनी कोविड क्रायसिस मॅनेजमेंट सेंटरचेही नेतृत्व केले.

२०२२ मध्ये, सिग्देल यांनी यूएस नेपाळ लँड फोर्स टास्कमध्ये नेपाळचे प्रतिनिधित्व केले आणि लष्करी राजदूताची भूमिका बजावली. २०२३ मध्ये त्यांना लेफ्टनंट जनरल पदावर बढती देण्यात आली आणि सप्टेंबर २०२४ मध्ये ४५ व्या लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी उप-सेनाप्रमुख म्हणूनही काम केले आहे.

सैन्यात भरती होण्यापूर्वी राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सर 

अशोक राज सिगदेल यांचा जन्म १ फेब्रुवारी १९६७ रोजी लुंबिनी प्रांतातील रूपंदेही जिल्ह्यात झाला. नेपाळ सैन्यात सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास सुमारे चार दशकांचा आहे. १९८६ मध्ये २५ व्या बेसिक कोर्समध्ये अव्वल स्थान मिळवून त्यांनी नेपाळ सैन्यात कमिशन मिळवले. सैन्याचा गणवेश परिधान करण्यापूर्वी ते राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सर होते.

याशिवाय, ते तायक्वांदो आणि टेबल टेनिसमध्येही पारंगत आहेत. २०२४ मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जनरल सिग्देल यांना भारतीय सैन्याच्या जनरलची मानद पदवी बहाल केली. यावरून दोन्ही देशांमधील घनिष्ठ लष्करी संबंध असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Nepalनेपाळ