शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळी शेरपाची तेवीस वेळा एव्हरेस्टवर यशस्वी चढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 06:18 IST

जिगरबाज नेपाळी शेरपाने एक, दोनदा नव्हे, तर तब्बल २३ वेळा माऊंट एव्हरेस्टची यशस्वी चढाई करण्याचे दिव्य करीत जगातील सर्वांत उंच शिखर ‘सर’ करण्याचा स्वत:चाच विक्रम मोडला.

काठमांडू : आयुष्यात एकदा का होईना, माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करण्याचे जगभरातील गिर्यारोहकाचे स्वप्न असते. हिमालयीन पर्वतरांगेतील वातावरण किंवा हिमस्खलन, आकस्मिक घटना वा तब्येतीने साथ न दिल्याने अनेकांना वारंवार प्रयत्न करूनही यात यश मिळत नाही.जिगरबाज नेपाळी शेरपाने एक, दोनदा नव्हे, तर तब्बल २३ वेळा माऊंट एव्हरेस्टची यशस्वी चढाई करण्याचे दिव्य करीत जगातील सर्वांत उंच शिखर ‘सर’ करण्याचा स्वत:चाच विक्रम मोडला.‘द हिमालयन टाइम्स’च्या वृत्तानुसार मागच्या वर्षी शेरपाने २२ व्या वेळी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा विक्रम केला होता. त्याने बुधवारी अन्य साथीदार शेरपांसोबत ८,८५० मीटर उंचीवर शिखर सर केले.तब्बल तेवीस वेळा माऊंट एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे ‘सर’ करणाऱ्या या नेपाळी गिर्यारोहकाचे नाव कामी रिता शेरपा आहे.‘माय रिपब्लिका’ या नेपाळी वृत्तपत्रानुसार कामी रिता १९९४ पासून माऊंट एव्हरेस्टवर चढाई करतो. १९९५ मध्ये त्याचा साथीदार मोहिमेच्या वाटेवरच आजारी पडल्याने त्याला एव्हरेस्टवर चढाई करता आलीनव्हती.२०१७ मध्ये कामी रिता शेरपा एकवीस वेळा माऊंट एव्हरेस्ट यशस्वीपणे सर करणारी तिसरी व्यक्ती ठरली होती. त्यावेळी त्याने अपा शेरपा आणि फूरबा ताशी शेरपा यांच्या विक्रमाची बरोबरी केली होती. २०१८ मध्ये सर्वाधिक वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करण्याचा विक्रम त्याच्या नावावर होता. (वृत्तसंस्था)सकाळी ७.५0 वाजता शिखरावर चढाईबुधवारी सकाळी ७ वाजून ५० मिनिटाला नेपाळच्या कामी रिता शेरपाने माऊंट एव्हरेस्टवर चढाई करून जगातील सर्वांत उंच शिखर ‘सर’ केले, असे वृत्त या वृत्तपत्राने सेव्हन समीट ट्रेक्स कंपनीचे अध्यक्ष मिंगमा शेरपा यांच्या हवाल्याने दिले आहे. कामी रिता शेरपा हा नेपाळच्या सोलीखुम्बू जिल्ह्यातील थमे गावचा आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयNepalनेपाळ