शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चीनशी मैत्री नेपाळला पडतेय भारी, आता भंगाराच्या भावात विकावी लागतायत विमानं; काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 13:16 IST

पाकिस्तान आणि श्रीलंकेला देशोधडीला लावल्यानंतर चीन गेल्या काही काळापासून नेपाळशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत आहे.

पाकिस्तान आणि श्रीलंकेला देशोधडीला लावल्यानंतर चीन गेल्या काही काळापासून नेपाळशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत आहे. जे कोणी चीनशी जवळीक साधतात ते देशोधडीला लागतातच अशी स्थिती आहे. यातच पाकिस्तान आणि श्रीलंकेनंतर आता नेपाळचेही वाईट दिवस सुरू झाले आहेत. चीननं त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आलीये. नेपाळ एअरलाइन्सने काही वर्षांपूर्वी चीनकडून विमानांची खरेदी केली होती, ती सदोष निघाली आहेत. आता नेपाळ एअरलाइन्स ही विमानं भंगारात विकत आहेत. नेपाळ एअरलाइन्सने ही चिनी विमानं ६.६६ अब्ज नेपाळी रुपयांना (५० मिलयन डॉलर्स) खरेदी केली होती. नेपाळच्या काठमांडू पोस्ट या न्यूज पोर्टलनुसार अधिकाऱ्यांनी ही विमानं ग्राऊंडेड केल्याचं म्हटलं. जितकी त्यांची किंमत आहे, त्यापेक्षा जास्त ती विमानं समस्या निर्माण करत आहेत.२०१४-१८ दरम्यान विमानांची खरेदीनेपाळनं २०१४ ते २०१८ दरम्यान चीनकडून एकूण सहा विमानं खरेदी केली होती. त्यापैकी एका विमानाचा अपघात झाला. तर उर्वरित पाच विमानं आता ग्राउंड करण्यात आली. यामध्ये दोन ५६ सीटर एमए६० आणि तीन १७ सीटर Y12E यांचा समावेश आहे. चिनी विमानांमध्ये सातत्यानं बिघाड होत आहे. उच्च देखभाल खर्चामुळे कर्जबाजारी नेपाळ एअरलाइन्सला ऑपरेट करणं खूप महाग झालंय. शिवाय, वैमानिकांची सततची कमतरता, परिणामी अपघात आणि अविश्वसनीयता यामुळे अधिकाऱ्यांना शक्य तितक्या लवकर विमानांना ग्राऊंडेड करण्यास भाग पडलंय. विमानं किमान तीन वर्षांपासून ग्राऊंडेड असून त्यांची उड्डाणंही झाली नाहीत. नेपाळ एअरलाइन्सनं आता ही विमानं केवळ २२० मिलियन नेपाळी रुपयांना (१.६५ मिलियन डॉलर्स) विक्रीसाठी ठेवली आहे.अधिकाऱ्यांनी काय म्हटलंनेपाळ एअरलाइन्स कॉर्पोरेशनच्या एका उच्च पदस्थ सूत्रांनुसार, ही किंमत एका स्वतंत्र आंतरराष्ट्रीय कंपनीनं निश्चित केली आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या कंपनीनं मूल्यांकन रिपोर्टसाठी २०००० डॉलर्स दिले. दरम्यान, हे स्क्रॅप मूल्य असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं. विमानं भाड्यानं देण्याचा प्रस्ताव अयशस्वी झाल्यानंतर ती विकण्याचा निर्णय घेण्यात आला. एवढ्या कमी किमतीत महागडी विमाने विकण्याच्या विचारानं नेपाळ एअरलाइन्स संचालक मंडळ खूश नसल्याची माहित समोर आलीये.

टॅग्स :Nepalनेपाळchinaचीन