शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमध्ये Gen Z सरकार? निकालात बालेन शाह यांची मोठी लाट; ओली अन् नेपाली काँग्रेसचा धुव्वा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 08:48 IST

नेपाळमध्ये एकूण २७५ जागांसाठी निवडणूक होत आहे. यातून थेट मतदानाच्या माध्यमातून १६५ सदस्य निवडले जातील आणि उर्वरित ११० सदस्य Proportional Represenation कोट्याने निवडले जाणार आहेत.

काठमांडू - नेपाळमधील निवडणुकीचे निकाल हळूहळू आता समोर येऊ लागले आहेत. या निकालात बालेन शाह यांची जबरदस्त लाट दिसून येत आहे. सुरुवातीच्या निकालात बालेन शाह यांची राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी आघाडीवर आहे तर इथल्या जुन्या पक्षांना मोठे नुकसान होताना दिसत आहे. 

आतापर्यंतच्या माहितीनुसार, ६१ जागांवर मतमोजणी सुरू आहे. त्यातील ५२ जागांवर बालेन शाह यांचा पक्ष आघाडीवर आहे. नेपाली काँग्रेस ५ आणि यूएमएल ४  जागांवर पुढे आहे. ओली यांच्यासह अनेक माजी पंतप्रधान, उपपंतप्रधान आणि मंत्री मतमोजणीत पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे. नेपाळमध्ये गुरुवारी लाखो लोकांनी मतदान केले. Gen Z च्या हिंसक आंदोलनानंतर देशात पहिल्यांदाच सामान्य निवडणूक होत आहे. या आंदोलनामुळे देशात केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वातील आघाडी सरकार पडले होते. या निवडणुकीत भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत होता.

नेपाळच्या या निवडणुकीकडे भारताचेही बारीक लक्ष आहे. गेल्या वर्षी असामान्य परिस्थिती असूनही निवडणूक कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल आम्ही पंतप्रधान सुशीला कार्की, नेपाळ सरकार आणि लोकांचे तसेच विविध घटकांचे अभिनंदन करतो असं भारताच्या परराष्ट्र खात्यातील प्रवक्त्यांनी सांगितले आहे. नेपाळमध्ये ६० टक्के मतदान झाले आहे. 

बालेन शाह यांची लाट

प्रसिद्ध रॅपर आणि इंजिनिअर म्हणून पुढे आलेले बालेन शाह यशस्वी राजकारणी म्हणून उभे राहिले आहेत. काठमांडूचे महापौर म्हणूनही त्यांनी काम केले आहे. बालेन शाह यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी(RSP) या नवीन पक्षाने देशातील सर्वात जुन्या २ राजकीय पक्षांचा अक्षरश: धुव्वा उडवला आहे. २०२२ मध्ये स्थापना झालेल्या आरएसपीला निवडणुकीच्या प्रचारात जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळाला. बालेन शाह हे पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार मानले जातात. नेपाळमध्ये एकूण २७५ जागांसाठी निवडणूक होत आहे. यातून थेट मतदानाच्या माध्यमातून १६५ सदस्य निवडले जातील आणि उर्वरित ११० सदस्य Proportional Represenation कोट्याने निवडले जाणार आहेत. १६५ जागांसाठी ३४०० उमेदवार निवडणूक लढवत होते तर PR च्या माध्यमातून ११० जागांसाठी ३१३५ उमेदवार रिंगणात होते.

कोण आहे बालेन शाह?

बालेन शाह हे प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार आहेत. त्यांचे अनेक टीव्ही शो, रॅप आणि म्युझिक व्हिडिओ समोर आलेत. युवकांमध्ये त्यांची क्रेझ अधिक आहे. बालेन शाह यांची जीवनशैली कायम चर्चेत असते. त्यांच्याकडे लग्झरी वाहने आहेत. ज्यात सुझूकीसारख्या मॉडेलचा समावेश आहे. २०२३ साली बालेन शाह यांचा टाईम मॅग्जिनच्या १०० प्रतिष्ठित लोकांच्या यादीत समावेश झाला होता. त्यांचा जन्म २७ एप्रिल १९९० साली काठमांडू येथे झाला होता. बालेन यांनी मास्टर्स कर्नाटकच्या इंजिनिअरींग कॉलेजमधून केले होते. शाह यांनी कचऱ्याचे नियोजन, पारदर्शी शासन, शहराचा विकास आराखडा, डिजिटल प्रशासन, युवकांचे संरक्षण यावर काम केले त्यामुळे आज त्यांच्या मागे युवकांची मोठी फौज आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nepal Election: Balen Shah's Wave Sweeps Away Old Guard; Gen Z Impact

Web Summary : Nepal's election sees Balen Shah's party surge ahead, leaving established parties behind. Young voters favor Shah, focusing on anti-corruption. India closely monitors the results as Shah gains prominence.
टॅग्स :Nepalनेपाळ