शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

नेपाळमध्ये राजेशाहीवरून गोंधळ, संघर्षात दोन जणांचा मृत्यू, ३० जण जखमी; पंतप्रधानांनी बोलावली आपत्कालीन बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 22:18 IST

शुक्रवारी नेपाळमधील लोकांनी राजेशाही परत आणण्याच्या मागणीसाठी तीव्र निदर्शने केली. हळूहळू या निदर्शनाचे रूपांतर हिंसाचारात झाले.

नेपाळमध्ये राजेशाही परत आणण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी निदर्शने केली काही वेळाने ही निदर्शने  हिंसक झाली. आंदोलकांनी एका घराला आग लावली आणि सुरक्षा बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती बिघडल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला. यावेळी काठमांडूसह तीन ठिकाणी कर्फ्यू लागू करण्यात आला.

निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा आणि पाण्याच्या फवारांचा वापर केला. टिनकुने भागात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यावर पोलिसांनी हवेत गोळीबार केला. येथे हजारो राजेशाही समर्थकांनी नेपाळमध्ये राजेशाही पुन्हा आणण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. येथे, पंतप्रधान केपी ओली यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. 

नेपाळ पेटले! हिंदूराष्ट्र आणि राजेशाहीच्या मागणीसाठी आंदोलन, रॅलीत झळकले CM योगींचे पोस्टर

मिळालेली माहिती अशी, काठमांडू येथील २९ वर्षीय सबीन महार्जन यांना या संघर्षादरम्यान गोळी लागल्याने रुग्णालयात मृत्यू झाला. टिनकुने परिसरातील एका इमारतीतून निषेधाचा व्हिडीओ शूट करताना अ‍ॅव्हेन्यूज टेलिव्हिजनचे छायाचित्रकार सुरेश रजक यांचा मृत्यू झाला. टिनकुने भागात, राजेशाही समर्थकांची सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झटापट झाली आणि त्यांनी सुरक्षा बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. 

रस्त्यावर उतरलेल्या निदर्शकांनी नेपाळचा राष्ट्रध्वज आणि माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांचे फोटो हातात घेतले होते. त्यांची पोलिसांशी झटापट झाली. या चकमकीत एक जण जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. राजेशाही समर्थक आणि विरोधकांनी वेगवेगळी निदर्शने केल्याने संघर्ष टाळण्यासाठी काठमांडूमध्ये शेकडो दंगलविरोधी दल तैनात करावे लागले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पश्चिम काठमांडूच्या रस्त्यांवर सैन्य तैनात करण्यात आले.

टॅग्स :Nepalनेपाळ