शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नवाज शरीफ यांनी भारतात पाठवले ४.९ अब्ज डॉलर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 04:14 IST

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ व अन्य काही जणांनी ४.९ अब्ज डॉलर इतका काळा पैसा पांढरा करण्यासाठी भारतात पाठविल्याचा आरोप असून, त्याप्रकरणी या सर्वांची चौकशी करण्याचे आदेश पाकिस्तानच्या नॅशनल अकाऊंटिबिलिटी ब्युरो (नॅब)ने दिले आहेत.

इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ व अन्य काही जणांनी ४.९ अब्ज डॉलर इतका काळा पैसा पांढरा करण्यासाठी भारतात पाठविल्याचा आरोप असून, त्याप्रकरणी या सर्वांची चौकशी करण्याचे आदेश पाकिस्तानच्या नॅशनल अकाऊंटिबिलिटी ब्युरो (नॅब)ने दिले आहेत.यासंदर्भात वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केलेल्या बातम्यांची नॅबचे अध्यक्ष व निवृत्त न्यायाधीश जावेद इक्बाल यांनी आज स्वत:हून दखल घेतली व या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात नॅबने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शरीफ यांनी केलेल्या या व्यवहाराची नोंद जागतिक बँकेने २०१६ साली घेतली होती.शरीफ यांनी ही रक्कम भारताच्या वित्त खात्याला पाठविली. त्यानंतर भारताच्या परकीय गंगाजळीत वाढ झाल्याचे दिसून आले होते. या व्यवहाराचे पाकिस्तानवर अनिष्ट परिणाम झाले होते. पनामा पेपर प्रकरणी शरीफ यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता. तीन भ्रष्टाचार प्रकरणांत शरीफ यांच्या विरोधात अकाऊंटिबिलिटी कोर्टात सध्या खटले सुरु आहेत. त्यांची लाहोर येथील जती उम्रा भागात मालमत्ता असून तेथील एका रस्त्याचा अनधिकृतरित्या विस्तार केल्याप्रकरणी शरीफ यांची नॅबकडून चौकशी सुरु आहे. (वृत्तसंस्था)भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी शरीफ यांना पंतप्रधानपदावर राहाण्यास अपात्र ठरविले. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून त्यांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागलेले आहे. भ्रष्टाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरविल्यास शरीफ यांना कारावासाची शिक्षाही होऊ शकते.

टॅग्स :Nawaz Sharifनवाज शरीफPakistanपाकिस्तानIndiaभारत