शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवाज शरीफ यांचा PM होण्याचा मार्ग जवळपास मोकळा, बिलावल यांची शर्यतीतून माघार; आणखी एका उमेदवाराचा PTIला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 02:58 IST

पीपीपी पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी मंगळवारी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून आपले नाव मागे घेतले. तसेच, नव्या सरकारचा भाग न होता, आपला पक्ष नवाज यांना पाठिंबा देईल, असे जाहीर केले आहे.

पाकिस्तानमध्ये पीएमएल-एन पक्षाचे प्रमुख नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांचा  विक्रमी चौथ्यांदा पंतप्रधान होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. खरे तर, पीपीपी पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी मंगळवारी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून आपले नाव मागे घेतले. तसेच, नव्या सरकारचा भाग न होता, आपला पक्ष नवाज यांना पाठिंबा देईल, असे जाहीर केले आहे.

या निवडणूकीत सर्वाधिक जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे. यांतील अधिकांश उमेदवार हे पीटीआय पक्षाचे समर्थन असलेले होते. निवडणूक निकाल येऊन पाच दिवस उलटले आहेत. मात्र तरीही पुढचे सरकार कुणाचे होणार, हा प्रश्न अजूनही कायम आहे. गेल्या 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या नॅशनल असेंब्लीच्या निवडणुकीत पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (पीएमएल-एन), पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या तीन प्रमुख पक्षांपैकी कुणालाही पूर्ण बहुमत मिळालेले नाही. यामुळे कोणताही पक्ष स्वबळावर सरकार स्थापन करू शकत नाही. परिणामी येथे त्रिशंकू संसदेची स्थिती निर्माण झाली आहे.

बिलावल भुट्टो यांनी आज पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, खरे तर, आपल्या पक्षाला केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी जनादेश नाही. या मुळे आपण स्वत:ला पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी पुढे करणार नाही. केंद्रात पीएमएल-एन आणि अपक्ष उमेदवारांची संख्या अधिक आहे.

पीटीआय समर्थित आणखी एका सदस्याचा 'पीएमएल-एन'मध्ये प्रवेश -दुसऱ्या बाजूला, माजी पंतप्रधान इम्रान खान यांना धक्का बसला आहे, कारण त्यांच्या पक्षाने पाठिंबा दिलेला आणखी एक अपक्ष उमेदवार पीएमएल-एनमध्ये सामील झाला आहे. नॅशनल असेंब्ली मतदारसंघ-54 मधून पीटीआय-समर्थित अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झालेले बॅरिस्टर अकील मलिक यांनी माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या उपस्थितीत पीएमएल-एनमध्ये प्रवेश केला. अकील मलिक यांनी पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज यांची भेट घेतली. त्यांनी पक्षाचे सर्वोच्च नेते नवाझ शरीफ आणि शाहबाज शरीफ यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानNawaz Sharifनवाज शरीफprime ministerपंतप्रधानPoliticsराजकारण