शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मंगळावर राहायला मिळणार? नासाकडे करा अर्ज, प्रक्रियेला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 06:33 IST

मंगळ ग्रहावर समानव अवकाश मोहीम काढता येईल का, याची चाचपणीही केली जात आहे. अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने तशी तयारी चालवली आहे. 

पत्रिकेत मंगळ असेल तर विवाह जुळण्यात अडचणी येतात, अशी आपल्याकडची धारणा. मात्र, लाल रंगाच्या या ग्रहाबद्दल अवकाश संशोधकांना प्रचंड आकर्षण आहे. मंगळ ग्रहावर समानव अवकाश मोहीम काढता येईल का, याची चाचपणीही केली जात आहे. अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने तशी तयारी चालवली आहे. हा सर्व जामानिमा का?मंगळ ग्रहावर निवास करताना काय अडचणी येऊ शकतील आणि त्यावर मात कशी करता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी हा सर्व जामानिमा आहे. मंगळाची वातावरणनिर्मिती असलेल्या या १७०० चौरस फुटांच्या डोममध्ये राहणाऱ्यांना सिम्युलेटेड स्पेसवॉक, शास्त्रीय संशोधन आणि आभासी वस्तुस्थिती व प्रत्यक्ष रोबोटिक नियंत्रण इत्यादींचे प्रशिक्षण दिले जाईल. मिशनचे उद्दिष्ट काय?मंगळ ग्रहावरील प्रत्यक्ष मोहिमेतील संभाव्य अडचणींचा सखोल अभ्यास याद्वारे केला जाईल.सर्व संभाव्य तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन त्यानुसार काम केले जाईल.अर्ज कोण करू शकणार आहे?या मिशनमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी १७ सप्टेंबरपर्यंत अर्ज करावा, असे नासाकडून सांगण्यात आले आहे. अर्जदार अमेरिकी नागरिक असावा व त्याचे वय ३० ते ५५ या वयोगटातील असावे. अर्जदाराने विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील मास्टर्स डिग्री मिळवलेली असावी तसेच या क्षेत्रात काम करण्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव उमेदवाराला असावा. मिशन नेमके आहे काय?नासाने ने ‘मार्स ड्युन अल्फा’ हे एक प्रारूप तयार केले आहे. या सिम्युलेटेड मॉड्युलमध्ये स्वयंपाकघर, वैद्यकीय उपचार, मनोरंजन, व्यायाम, कामकाज, पीकवृद्धी, तांत्रिक काम इत्यादींसाठी पुरेशी जागा आणि दोन स्नानगृहे इत्यादी सोयीसुविधा देण्यात येणार आहे. या ठिकाणी वर्षभर राहण्यासाठी चार विद्यार्थ्यांची निवड होईल, त्यांना विद्यावेतन दिले जाणार आहे.नासातर्फे १७०० चौरस फूट आकाराचे मॉड्यूल तयार केले जाणार असून त्या ठिकाणी मंगळ ग्रहासारखे वातावरण करण्यात येणार आहे. पुढील चार वर्षे हा उपक्रम सुरू राहणार आहे. 

टॅग्स :Marsमंगळ ग्रह