शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

एलियन्सचा धोका; जगाला वाचवण्यासाठी 'नासा'मध्ये व्हॅकेन्सी, पगारही रग्गड

By sagar.sirsat | Updated: August 4, 2017 11:09 IST

पृथ्वीला एलियन्सपासून धोका असल्याचं केवळ सिनेमा किंवा गोष्टींपर्यंत सीमित राहिलेलं नसल्याचं स्पष्ट. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने एलियन्सचा संभाव्य धोका ओळखला,पृथ्वीचं रक्षण करता यावं यासाठी काही शूर अधिका-यांची नासाला गरज.

ठळक मुद्दे एलियन्सच्या हल्ल्यापासून पृथ्वीचं रक्षण करता यावं यासाठी काही शूर अधिका-यांची नासाला गरज प्लॅनेट्री प्रोटेक्शन ऑफिसर (PPO) म्हणजेच ग्रह संरक्षण अधिकारी या पदासाठी भरतीप्लॅनेट्री प्रोटेक्शन ऑफिसरचं काम आव्हानात्मक असेल. त्याला एलियन्समुळे पृथ्वीला असलेल्या संभाव्य धोक्याचा अंदाज घेऊन त्याबाबत नासाला माहिती पुरवावी लागेल.या अधिका-याला अभियांत्रिकी क्षेत्रात उच्चस्तरीय ट्रेनिंग आणि अनुभव असणं गरजेचं आहे. याशिवाय प्लॅनेट्री प्रोटेक्शनमध्ये तो तज्ञ असायला हवा.

वॉशिंग्टन, दि. 3 - ''ब्रम्हांडात आपण एकटेच आहोत का?  हे आम्हालाही अजून नक्की माहिती नाही... पण या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आमचे अनेक मिशन सुरू आहेत'' असं उत्तर एलियन्सच्या अस्तित्वाबाबत नासाकडून काही दिवसांपूर्वी देण्यात आलं होतं. पण नुकत्याच आलेल्या एका वृत्तानुसार पृथ्वीला एलियन्सपासून धोका असल्याचं केवळ सिनेमा किंवा गोष्टींपर्यंत सीमित राहिलेलं नसल्याचं जवळपास स्पष्ट होत आहे. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने एलियन्सचा संभाव्य धोका ओळखला आहे. एलियन्सच्या हल्ल्यापासून पृथ्वीचं रक्षण करता यावं यासाठी काही शूर अधिका-यांची नासाला गरज आहे. यासाठी नासाने अशाच शूर अधिका-यांची भरती करण्याचं ठरवलं आहे. या कामासाठी नासाकडून रग्गड पगारही दिला जाणार आहे.

वॉशिंग्टन पोस्ट आणि इन्डिपेंडंट(independent.co.uk)यासारख्या इंग्रजी वेसबाइटच्या वृत्तानुसार या कामासाठी नासा 1 लाख 24 हजार 406 डॉलर ते  1 लाख 87 हजार डॉलर पगार वर्षाला देण्यास तयार आहे. अमेरिकी सरकारच्या एका अधिकृत वेबसाइटवर या भरती प्रक्रियेबाबत माहितीही देण्यात आली आहे. प्लॅनेट्री प्रोटेक्शन ऑफिसर (PPO) म्हणजेच ग्रह संरक्षण अधिकारी या पदासाठी ही भरती आहे. पहिल्या तीन वर्षाच्या कराराच्या आधारावर या नोकरीची ऑफर आहे. 

हे असणार प्लॅनेट्री प्रोटेक्शन ऑफिसरचं काम- प्लॅनेट्री प्रोटेक्शन ऑफिसरचं काम आव्हानात्मक असेल. त्याला एलियन्समुळे पृथ्वीला असलेल्या संभाव्य धोक्याचा अंदाज घेऊन त्याबाबत नासाला माहिती पुरवावी लागेल. मानवामुळे किंवा अन्य कोणामुळे अवकाशातील महत्वाच्या घटकांना धोका पोहोचणार नाही याशिवाय पृथ्वीच्या कक्षेत एलियन्स प्रवेश करणार नाहीत याची खबरदारी घेणं, तसंच अवकाशातील नासाच्या उपग्रहांची रक्षा करणं, नासाच्या फ्लाइट मिशनला कार्यान्वित करणं आणि पृथ्वीबाहेरील जैविक प्रदूषण रोखणं ही प्लॅनेट्री प्रोटेक्शन ऑफिसरची मुख्य कामं असणार आहेत. 

प्लॅनेट्री प्रोटेक्शन ऑफिसर पदासाठी काय आहे पात्रता-  या अधिका-याला अभियांत्रिकी क्षेत्रात उच्चस्तरीय ट्रेनिंग आणि अनुभव असणं गरजेचं आहे. याशिवाय प्लॅनेट्री प्रोटेक्शनमध्ये तो तज्ञ असायला हवा. स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता असायला हवी. अवघड परिस्थितीत अंदाज घेऊन योग्य निर्णय घेण्याची क्षमता असावी.