शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नामिबियाचे राष्ट्रपती हेज गींगॉब यांचे कर्करोगाने निधन, वयाच्या ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 12:26 IST

Hage Geingob : नामिबियाच्या राष्ट्रपतीपदी दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर गेल्या महिन्यात हेज गींगॉब यांनी आपल्याला कर्करोग झाल्याचे सांगितले होते. 

Hage Geingob : नामिबियाचे राष्ट्रपती हेज गींगॉब यांचे रविवारी सकाळी निधन झाले. हेज गींगॉब यांनी ८२ व्या वर्षी विंडहोक येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. यासंदर्भात नामिबियाच्या राष्ट्रपती कार्यालयाने एक निवेदन जारी केले आहे. नामिबियाच्या राष्ट्रपतीपदी दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर गेल्या महिन्यात हेज गींगॉब यांनी आपल्याला कर्करोग झाल्याचे सांगितले होते. 

कार्यवाहक राष्ट्रपती नांगोलो मुम्बा यांनीही राष्ट्रपतींच्या निधनाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. दु:ख व्यक्त करताना त्यांनी लिहिले की, "अत्यंत दु:ख आणि खेदाने मी सर्वांना कळवत आहे की, नामिबिया प्रजासत्ताकचे आमचे प्रिय डॉ. हेज गींगॉब यांचे आज निधन झाले." हेज गींगॉब यांच्यामागे त्यांची पत्नी मोनिका गींगॉब आणि तीन मुले आहेत. 

गेल्या महिन्यात जेव्हा हेज गींगॉब यांची नियमित वैद्यकीय तपासणी केली जात होती, तेव्हा त्यांना कर्करोग झाल्याची बातमी पहिल्यांदा समोर आली होती. वैद्यकीय तपासादरम्यान त्यांच्या बायोप्सीमध्ये कर्करोगाच्या पेशी आढळून आल्या होत्या. निधनापूर्वी त्यांच्यावर विंडहोक येथील लेडी पोहंबा रुग्णालयात उपचार सुरू होते. याआधी २०१३  मध्ये त्यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया झाली होती. तर गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत त्यांच्यावर एऑर्टिकची शस्त्रक्रिया झाली होती.

हेज गींगॉब यांनी नामिबियाचे पंतप्रधान म्हणून प्रदीर्घ काळ काम केले आहे. याशिवाय सर्वाधिक काळ राष्ट्रपतीपद भूषवणारे ते तिसरे व्यक्ती होते. हेज गींगॉब यांचा जन्म १९४१ मध्ये उत्तर नामिबियातील एका गावात झाला होता. हेज गींगॉब हे ओवाम्बो समाजातील होते. नामिबियामध्ये निम्याहून अधिक लोकसंख्या ओवाम्बो समाजाची आहे. हेज गींगॉब यांनी आपल्या आयुष्यातील जवळपास तीन दशके बोत्सवाना आणि युनायटेड स्टेट्समध्ये घालवली होती. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय