शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

म्यानमारमधील भूकंप बळींची संख्या १७००वर, एनडीआरएफचे बचावकार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 05:55 IST

Myanmar Earthquake: म्यानमारमधील भयंकर भूकंपातील मृतांची संख्या १७००हून अधिक झाली. भूकंपाच्या तडाख्याने कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचे मृतदेह बचाव कार्यादरम्यान सापडत आहेत.

बँकॉक - म्यानमारमधील भयंकर भूकंपातील मृतांची संख्या १७००हून अधिक झाली. भूकंपाच्या तडाख्याने कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचे मृतदेह बचाव कार्यादरम्यान सापडत आहेत. त्यामुळे मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भीती अधिकाऱ्यांनी सोमवारी व्यक्त केली. म्यानमारमध्ये मदतकार्यात सहभागी झालेल्या भारताच्या नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सच्या (एनडीआरएफ)च्या जवानांनी सोमवारी इमारतींच्या ढिगाऱ्याखालून सात मृतदेह बाहेर काढले. 

म्यानमार सरकारचे प्रवक्ते मेजर जनरल झॉ मिन टुन यांनी सांगितले की,  हा भूकंप झाला तेव्हा विशिष्ट धर्मीय मोठ्या संख्येने प्रार्थना स्थळांमध्ये प्रार्थना करीत होते. त्यातील ७०० जण भूकंपामुळे मरण पावल्याची माहिती स्प्रिंग रिव्होल्युशन म्यानमार मुस्लीम नेटवर्कने दिली. भूकंपात ६० प्रार्थना स्थळांचे मोठे नुकसान झाले आहे. 

एनडीआरएफने मंडालेत काढले ७ मृतदेह बाहेर भारताच्या एनडीआरएफ पथकाने म्यानमारमध्ये मंडाले येथे भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखालून सोमवारी सात मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर या पथकाने कोसळलेल्या आणखी दहा इमारतींच्या ठिकाणी बचावकार्य सुरू केले. मंडालेतील सेक्टर डीमधील १३ इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्यांची सुटका करण्याचे काम या पथकाला देण्यात आले. म्यानमारमध्ये भूकंप झाल्यानंतर भारताने ऑपरेशन ब्रह्माच्या अंतर्गत त्या देशाला मदतसामग्री पाठविली. तसेच एनडीआरएफ पथक पाठवून बचावकार्य सुरू केले. भूकंपामुळे संपूर्ण म्यानमारमध्ये दूरसंचार सेवा सध्या बंद आहे. त्यामुळे किती भूकंपग्रस्त मरण पावले व किती जखमी झाले, यांची योग्य आकडेवारी मिळणे काहीसे कठीण बनले आहे.  

बँकॉकमध्ये गगनचुंबी इमारतींची तपासणी होणारम्यानमारप्रमाणेच थायलंडमध्येही शुक्रवारी भूकंपाचे धक्के बसून मोठ्या प्रमाणावर हादरे बसलेल्या गगनचुंबी इमारतींची तपासणी करण्यात येणार आहे. बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत भूकंपामुळे कोसळली. त्या शहराचे गव्हर्नर चाडचार्ट सिटीपंट यांनी त्या जागी भेट दिली. कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा यंत्राद्वारे बाजूला करण्यात येत होता, असे त्यांना  आढळून आले. 

 

टॅग्स :EarthquakeभूकंपMyanmarम्यानमारThailandथायलंडInternationalआंतरराष्ट्रीय