शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

US Visa: माझा प्रियकर/प्रेयसी अमेरिकेन नागरिक असल्यास फियान्से व्हिसासाठी अर्ज करू शकतो/शकते का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 15:10 IST

US Visa: प्रियकर/प्रेयसी अमेरिकन नागरिक असून तो/ती अमेरिकेत वास्तव्यास असल्यास कोणत्या व्हिसासाठी अर्ज करावा? त्यासाठीची प्रक्रिया कशी आहे..?

प्रश्न: माझा प्रियकर/प्रेयसी अमेरिकेन नागरिक आहे. मग मी फियान्से व्हिसासाठी अर्ज करू शकतो/शकते का?उत्तर: होय, अमेरिकेचा नागरिक परदेशात राहणाऱ्या त्याच्या/तिच्या फियान्सेसाठी अर्ज करू शकतो. K-1 (फियान्से) व्हिसाच्या मदतीनं परदेशाती राहणारा प्रियकर/प्रेयसी अमेरिकेत येऊन तिच्या अमेरिकन नागरिक असलेल्या प्रियकर/प्रेयसीसोबत लग्न करू शकतो/शकते. मात्र अमेरिकेत दाखल झाल्यानंतर ९० दिवसांच्या आत त्यांनी विवाह करायला हवा. K-1 अर्जदाराच्या अल्पवयीन मुलालादेखील K-2 व्हिसा मिळू शकतो आणि तो प्रियकर/प्रेयसीसोबत प्रवास करू शकतो. यासाठी अर्जदाराकडे K1 पालकांकडे असलेली सर्व कागदपत्रं असणं आवश्यक आहे. यामध्ये पालक-मूल यांचं नातं दाखवणाऱ्या पुराव्यांचादेखील समावेश असावा. अमेरिकेतील व्यक्तीशी विवाह केल्यानंतर, परदेशातील नागरिक कायदेशीर कायमस्वरुपी नागरिक (एलपीआर) होण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी (डीएचएस), यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसकडे (यूएससीआयएस) अर्ज करू शकता.मंजूर करण्यात आलेला K1 अर्ज यूएससीआयएसकडून मंजूर झाल्यानंतर चार महिन्यांसाठी वैध असतो. दूतावासातील अधिकारी याचिकेची वैधता वाढवू शकतात. प्रेमी युगुलानं ९० दिवसांच्या आत लग्न न केल्यास परदेशातून आलेल्या व्यक्तीला देश सोडावा लागेल.फियान्से व्हिसासाठीची प्रक्रिया काय?अमेरिकेच्या नागरिकानं त्याचं वास्तव्य असलेल्या भागातील यूएससीआयएस कार्यालयात परदेशातील असलेल्या प्रियकर/प्रेयसीसाठी आय-१२९ अर्ज दाखल करायला हवा. यूएससीआयएस कार्यालयानं तुमचा अर्ज मंजूर केल्यानंतर तो राष्ट्रीय व्हिसा सेंटरकडे (एनव्हीसी) पाठवला जातो. एनव्हीसी अर्जदाराला केस नंबर देईल आणि तो अर्ज अमेरिकेच्या दूतावासाकडे किंवा वकिलातीकडे पाठवेल. याची माहिती एनव्हीसी अर्जदाराला मेलच्या माध्यमातून देईल.

यासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक असतात? प्रक्रियेत कशाचा समावेश?अर्ज DS-160 ऑनलाईन भरलेला असावा.लाभार्थ्याकडे अमेरिकेपर्यंत प्रवास करण्यासाठी वैध पासपोर्ट असावा.जन्मदाखलाअर्जदार आणि लाभार्थ्याच्या माजी पती/पत्नीचे घटस्फोट किंवा मृत्य प्रमाणपण (असल्यास)१६ वर्षे किंवा त्यावरील व्यक्तीचे पोलीस प्रमाणपत्रवैद्यकीय चाचणीआर्थिक मदतीचे पुरावेदोन 2x2 पासपोर्ट फोटोनात्याचा पुरावा

वरील कागदपत्रांसोबतच मुलाखत घेणारा दूतावासातील अधिकारी नात्यांचे आणि आर्थिक मदतीचे अधिक पुरावे मागू शकतो.

मी माझ्या डॉक्टरांनी दिलेला वैद्यकीय अहवाल जमा करू शकतो का?नाही, अधिकृत डॉक्टरांच्या पॅनलकडून सर्व अजदारांची वैद्यकीय चाचणी घेतली जाते. अर्जदार ज्या अमेरिकेन दूतावासात किंवा वकिलातीत व्हिसासाठी अर्ज करतो, तिथूनच लाभार्थ्याला वैद्यकीय चाचणीसंबंधीच्या सूचना दिल्या जातात. यामध्ये अधिकृत डॉक्टरांच्या पॅनलच्या माहितीचादेखील समावेश असतो.

सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceac वर जाऊन तपासू शकता.फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसा