शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत मुस्लीम मुलीची हत्या

By admin | Updated: June 20, 2017 01:10 IST

अमेरिकेच्या व्हर्जिनिया प्रांतात एका माथेफिरूने मुस्लीम मुलीचे (वय १७) अपहरण करून तिची हत्या केली. या मुलीचा मृतदेह तळ्यात आढळला.

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या व्हर्जिनिया प्रांतात एका माथेफिरूने मुस्लीम मुलीचे (वय १७) अपहरण करून तिची हत्या केली. या मुलीचा मृतदेह तळ्यात आढळला. द्वेषातून घडलेला हा गुन्हा असण्याची शक्यता आहे. नबरा हुसैन असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी डार्विन मार्टिनेझ टोरेस (वय २२) या संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत. रेस्टोन येथे राहणारी नबरा पहाटेच्या सहरीसाठी (रोजा सुरू होण्याआधी) मैत्रिणींसह स्थानिक उपाहारगृहात गेली होती. तेथून परतताना एक कारचालक त्यांच्या दिशेने येऊ लागला. नबराच्या मैत्रिणी मशिदीकडे पळाल्या. परंतु आपली एक मैत्रीण गायब असल्याचे त्यांना आढळले. त्यांनी ही माहिती आॅल ड्युलेस एरिया मुस्लीम सोसायटीला दिली. नंतर पोलिसांना कळविताच बेपत्ता नबराचा शोध सुरू झाला. अनेक तासांच्या शोधानंतर पोलिसांना एका तळ्यात नबराचा मृतदेह आढळून आला. तो नबराचा असल्याची खात्री पटली असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, नबराचा शोध घेत असताना संशयित त्या भागात संशयास्पदरीत्या कार चालवत असल्याचे पोलिसांना आढळून आले. घटनास्थळी एक बेसबॉल बॅटही आढळली आहे. एका ठिकाणी आम्हाला काही पुरावे सापडले. त्यामुळे नबरावर तेथेच हल्ला झाला असावा. (वृत्तसंस्था)