शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदला अटक करा, अमेरिकेचा पाकिस्तानवर दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 19:54 IST

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदच्या सुटकेवर अखेर अमेरिकेने भाष्य केले आहे.

ठळक मुद्देसुटका झाल्यानंतर सईदने शुक्रवारी लाहोरमधल्या मशिदीत आपल्या समर्थकांना संबोधित केलेहाफिज सईदची लाहोरमधील आपल्या घरकैदेतून सुटका झाली तेव्हा त्याने केक कापून आपलं स्वातंत्र्य साजरं केलं.

वॉशिंग्टन :  मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदच्या सुटकेवर अखेर अमेरिकेने भाष्य केले आहे. हाफीजची नजरकैदेतून सुटका झाल्याबद्दल अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. जानेवारीपासून हाफीज सईद नजरकैदेत होता. बुधवारी पाकिस्तानातील न्यायिक समीक्षा बोर्डाने जमता-उद-दावाचा प्रमुख हाफीज सईदची नजरकैदेतून सुटका करण्याचे आदेश दिले होते. 

सुटका झाल्यानंतर सईदने शुक्रवारी लाहोरमधल्या मशिदीत आपल्या समर्थकांना संबोधित केले. अमेरिकेने सईदच्या सुटकेबद्दल चिंता व्यक्त करताना त्याला पुन्हा अटक करण्यात यावी, असे म्हटले आहे. लष्कर-ए-तय्यबा ही सईदची दहशतवादी संघटना अमेरिकन नागरिकांसह शेकडो नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हिथर नॉरेट म्हणाल्या. सईद मोकाट सुटता कामा नये, त्याला अटक करण्याची जबाबदारी पाकिस्तान सरकारची आहे, असे नॉरेट म्हणाल्या.

सईदची नजरकैद आणखीं तीन महिन्यांनी वाढवण्यासाठी पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या सरकारने केलेली विनंती न्यायिक समीक्षा बोर्डाने फेटाळून लावली. 31 जानेवारीला सईद आणि त्याचे चार साथीदार अब्दुल्लाह उबेद, मलिक झफर, अब्दुल रहमान अबिद आणि काझी काशिफ हुसैन यांना पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या सरकारने दहशतवाद विरोधी कायद्याखाली 90 दिवसांसाठी अटक केली होती. 

सुटकेनंतर पाकिस्तानमध्ये रात्रभर जश्न, केक कापून साजरं केलं स्वातंत्र्यहाफिज सईदची लाहोरमधील आपल्या घरकैदेतून सुटका झाली तेव्हा त्याने केक कापून आपलं स्वातंत्र्य साजरं केलं. इतकंच नाही, गुरुवारी रात्री हाफिज सईदच्या स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा होत असताना, पाकिस्तान सरकारमधील अधिकारी हाफिज सईदचा साहेब म्हणून उल्लेख करत होते. मुंबई दहशतवादी हल्ल्याला नऊ वर्ष पुर्ण होत असतानाच, हाफिज सईदची सुटका झाली आहे. हाफिज सईदचं अभिनंदन करण्यासाठी जमात-उद-दावाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. सुटका झाल्यानंतर हाफिज सईदने समर्थकांसोबत आनंद साजरा केला. हाफिज सईदचा एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये हाफिज केक आणि मिठाई खाताना दिसत आहे. 

टॅग्स :hafiz saedहाफीज सईद