शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत मॉलमध्ये गोळीबार, लहान मुलासह 8 जण जखमी

By ravalnath.patil | Updated: November 21, 2020 10:01 IST

shooting at the Mayfair Mall in Wisconsin : या घटनेची वाउटोसा पोलीस विभागातील अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे.

ठळक मुद्देया गोळीबारात एका लहान मुलासह सात जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या विस्कॉन्सिन येथील मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात आठ जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून शुक्रवारी एफबीआय आणि मिल्वॉकी काउंटी पोलीस कार्यालयाने ट्विट केले की, त्यांचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

ज्यावेळी आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, तेव्हा हल्लेखोराने तेथून पळ काढला होता, असे वाउटोसा पोलीस विभागाने एका निवेदनात म्हटले आहे. या गोळीबारात एका लहान मुलासह सात जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

 

पोलिसांनी हल्लेखोर  20 ते 30 वयोगटातील असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओनुसार अनेक मॉल कामगार इमारतीत लपले होते. दुकानदार जिल वोले यांनी एका स्थानिक न्यूज स्टेशनला सांगितले की, ज्यावेळी गोळीबार सुरू झाला, त्यावेळी ते आपल्या 79 वर्षाच्या आईसोबत दुकानात होते.

दुकानदार आणि घटनास्थळी असलेले ग्राहक या हिंसक घटनेचा बळी ठरल्यामुळे ते निराश आणि संतप्त आहेत, असे मॉल ऑपरेटर ब्रूकफील्ड प्रॉपर्टीज यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच, या घटनेची वाउटोसा पोलीस विभागातील अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे. या घटनेच्या तपासासाठी आम्ही पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करत आहेत, असेही मॉल ऑपरेटर ब्रूकफील्ड प्रॉपर्टीजच्या निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाShootingगोळीबार