शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अंडरवेअरमध्ये पैसे लपवताना सापडले खासदार, कोरोना फंडात घोटाळा केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 14:49 IST

Corruption News :कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावासोबतच भ्रष्टाचाराच्या प्रकारांनाही ऊत आला आहे. यादरम्यान भ्रष्टाचारविरोधी पथकाने घातलेल्या एका धाडीत सत्ताधारी पक्षाचे एक खासदार अंडरवेअरमध्ये पैसे लपवलेल्या अवस्थेत रंगेहात सापडले.

ठळक मुद्देराष्ट्रपती जेअर बोलसनारो यांच्या पक्षाचे एक खासदार अंडरवेअरमध्ये पैसे लपवलेल्या अवस्थेत रंगेहात सापडलेखासदार चिको रॉड्रिग्स यांच्या अंडरवेअरमधून ३ लाख ८८ हजार ब्राझिलीयन रियाल एवढी रक्कम जप्त आपल्याचा बदनाम करण्यासाठी हे कारस्थान रचले गेले आहे, चिको रॉड्रिग्स यांनी केला दावा

रियो दि जानिरो  - ब्राझीलमध्ये कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावासोबतच भ्रष्टाचाराच्या प्रकारांनाही ऊत आला आहे. यादरम्यान भ्रष्टाचारविरोधी पथकाने घातलेल्या एका धाडीत राष्ट्रपती जेअर बोलसनारो यांच्या पक्षाचे एक खासदार अंडरवेअरमध्ये पैसे लपवलेल्या अवस्थेत रंगेहात सापडले. तपासणीदरम्यान, खासदार चिको रॉड्रिग्स यांच्या अंडरवेअरमधून ३ लाख ८८ हजार ब्राझिलीयन रियाल एवढी रक्कम जप्त करण्यात आली.सत्ताधारी पक्षातील एक सिनेटर भ्रष्टाचारामध्ये गुंतला असल्याची माहिती भ्रष्टाचारविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर उत्तर ब्राझीलमधील रोरिमा राज्यातील चिको रॉड्रिग्सच्या घरावर बुधवारी धाड टाकण्यात आली. त्यांच्यावर रोरिमा राज्याला कोरोनाच्या संसर्गाचा सामना करण्यासाठी देण्यात आलेल्या फंडामध्ये अफरातफर करण्यात आल्याचा आरोप आरोप होता.दरम्यान, चिको रॉड्रिग्स यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून धाडीबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, पोलिसांनी आपल्या घराची तपासणी केली आहे. मात्र जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेचा उल्लेख त्यांनी केलेला नाही. तसेच ही रक्कम कुठे सापडली याचाही उल्लेख केलेला नाही. तसेच आपण काहीही चुकीचे केलेले नाही. आपल्याचा बदनाम करण्यासाठी हे कारस्थान रचले गेले आहे, असा दावा त्यांनी केला आहे.ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोलसनारो यांनी या संपूर्ण घटनेचे खापर प्रसारमाध्यमांच्या डोक्यावर फोडले आहे. सरकारला भ्रष्टाचारी सिद्ध करण्यासाठी खोट्या घटनेचा वापर केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, ही कारवाई म्हणजे आमचे सरकार भ्रष्टाचाराविरोधात कठोरपणे पावले उचलत असल्याचे उदाहरण आहे, असा दावा बोलसनारो यांनी केला आहे.ब्राझीलचे राष्ट्रपती बोलसनारो यांना भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवल्यामुळेच सत्ता मिळाली होती. मात्र त्यांनी जेव्हापासून सत्ता सांभाळली आहे तेव्हापासून त्यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले आहेत. बोलसनारो यांचे पुत्र फ्लेव्हियो यांच्यावरही असेच आरोप झाले होते. रियो दि जानिरो प्रतिनिधित्व करत असताना सार्वजनिक संपत्तीचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारBrazilब्राझीलInternationalआंतरराष्ट्रीय