शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

मंगळाच्या दिशेने सोडलेली मोटार अंतराळात भरकटली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 03:42 IST

इलॉन मस्क या अब्जाधीश अमेरिकी उद्योगपतीच्या स्पेसएक्स कंपनीने मंगळ ग्रहाभोवती घिरट्या घालण्यासाठी पाठविलेली ‘टेस्ला रोडस्टर’ ही स्पोर्ट््स कार मार्गभ्रष्ट होऊन अंतराळात भरकटली आहे.

केप कॅनेव्हरल (कॅलिफोर्निया): इलॉन मस्क या अब्जाधीश अमेरिकी उद्योगपतीच्या स्पेसएक्स कंपनीने मंगळ ग्रहाभोवती घिरट्या घालण्यासाठी पाठविलेली ‘टेस्ला रोडस्टर’ ही स्पोर्ट््स कार मार्गभ्रष्ट होऊन अंतराळात भरकटली आहे.ही कार मंगळाची कक्षा ओलांडून सूर्यमालेच्या बाहेर असलेल्या उल्का व अशनींच्या पट्ट्यात शिरली असून ती कुठवर पोहोचेल, कुठे जाऊन स्थिरावेल, बाह्य अवकाशाच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत किती काळ टिकेल, याविषयी अनिश्चितता आहे. इलॉन मस्क यांनी ही माहिती देताना लिहिले की, मूळ योजनेनुसार ही स्पोर्ट््स कार व आतील डमी ड्रायव्हर यांना मंगळ-पृथ्वी यांच्या दरम्यानच्या कक्षेत जायचे होते. पण ही कार इच्छित मार्ग सोडून पुढे आणखी सुदूर अंतराळात जात आहे. ग्रहमालेला लागून असलेल्या उल्का आणि अशनींनी भरलेल्या पट्ट्याच्या दिशेने ती जात आहे. रॉकेटच्या इंजिनाचा अपेक्षेहून जास्त रेटा मिळाल्याने असे झाले असावे. (वृत्तसंस्था)>कुठे जाणार हे अनिश्चितअंंतराळात सोडलेल्या या स्पोर्ट््स कारच्या नेमक्या भ्रमणमार्गाचा नकाशा स्पेसएक्स कंपनीने जाहीर केलेला नाही. त्यामुळे ती नेमकी कुठपर्यंत जाऊन पोहोचेल याचा अंदाज करणे कठीण आहे. ग्रहमालेतील परस्परांना छेद देणा-या गुरुत्वाकर्षण कक्षांच्या ओढाताणीने ती नेमकी कुठे स्थिरावेल हेही अनिश्चित आहे. परंतु असंख्य उल्का आणि अशनींनी भरलेल्या पट्ट्यातून जाताना तिची त्यापैकी एकाशी टक्कर होणे किती काळ टळेल याची अटकळ करणेही अशक्य आहे.