शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या भावनेचा आवेग, पण सावधगिरीचा लगाम; नर्स मुलगी ड्यूटीहून परतताच अंगावर चादर टाकून घेतली गळाभेट अन् म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 10:21 IST

येथील 28 वर्षांची केल्सी केर अमेरिकेच्या ओहियो येथे नर्स म्हणून कार्यरत आहे. कोरोना संकटात ती एकमहिना रुग्णालयातून घरी परतलीच नव्हती. मात्र गुरुवारी ती काही अत्यावश्यक साहित्य घेण्यासाठी घरी आली होती.

ठळक मुद्देआईच्या मायेचे हे सुंदर दृष्य अमेरिकेतील आहेकेल्सी कोरोना संकटात एकमहिना रुग्णालयातून घरी परतलीच नव्हतीकेल्सी म्हणाली, हा अत्यंत सुंदर अनुभव आहे

वॉशिंग्टन : म्हणतातना आईच्या भावनेची तुलना जगात कशाशीही आणि कधीही होऊ शकत नाही. एकीकडे संपूर्ण जगात कोरोना व्हायरस हाहाकार घालत आहे. तर दुसरीकडे या व्हायरसचे संक्रमण होऊ नये, म्हणून लोक वेगवेगळे उपाय करतानाही दिसत आहेत. मात्र, असे असतानाच आईच्या मायेचे एक सुंदर दृष्य अमेरिकेत बघायला मिळाले. 

येथील 28 वर्षांची केल्सी केर अमेरिकेच्या ओहियो येथे नर्स म्हणून कार्यरत आहे. कोरोना संकटात ती एकमहिना रुग्णालयातून घरी परतलीच नव्हती. मात्र गुरुवारी ती काही अत्यावश्यक साहित्य घेण्यासाठी घरी आली. यावेळी आई चेरिल नॉर्टन सुरूवातीला तर तिच्याकडे दुरूनच पाहत उभ्या होत्या. मात्र, थोड्याच वेळात त्यांनी जवळ असलेली एक चादर घेतली आणि त्या चादरीत आपल्या मुलीला पूर्णपणे गुढाळून त्यांनी तिला मिठी मारली आणि त्यांचा हुंदका फुटला.

...असे माझ्या मुलीसोबतही होऊ नये, हीच माझी इच्छा होती -या घटनेनंतर चेरिल म्हणाल्या, जवळपास एक महिना ती माझ्यापासून दूर होती आणि जेव्हा मला तिला पाहण्याची संधी मिळाली, तेव्हा ती पूर्णपणे बरी आहे, की नाही, हे मला जाणून घ्यायचे होते. तिला पाहता क्षणी पळत जाऊन मिठी मारायची माझी इच्छा होती. मात्र, सुरक्षितताही तेवढीच आवश्यक होती. मी तत्काळ लॉन्ड्रीच्या बॅगेतून एक चादर काढली आणि केल्सीला त्यात गुंढाळून छातीशी लावले. मी सोशल मीडिवर बघत आहे, की अनेक आरोग्य कर्मचारी स्वतःला एकटे-एकटे समजत आहेत. मात्र, असे माझ्या मुलीसोबत होऊ नये, अशी माझी इच्छा होती.

हा एक सुंदर अनुभव होता - केल्सीया प्रसंगावर बोलताना केल्सी म्हणाली, ‘मी गरज पडली, की कार घरी पाठवायचे आणि आई-बाबा आवश्यक साहित्य पाठवून द्यायचे. अशा पद्धतीने आईने गळाभेट घेणे हे माझ्यासाठी स्पेशल गिफ्ट आहे. हा अत्यंत सुंदर अनुभव आहे.'

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाUSअमेरिकाUnited Statesअमेरिका