अमेरिकेतील मिसोरीमध्ये एका महिलेने कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी असे काम केले, जे ऐकून सगळेच हैराण झाले आहेत. खरं तर, ४८ वर्षीय लॉरा ओगलेस्बेने स्वतःच्या मुलीचे ओळखपत्र चोरून केवळ महाविद्यालयात प्रवेश घेतला नाही. उलट या ओळखपत्राच्या मदतीने लाखो रुपयांचे कर्ज घेतले. तसेच कॉलेजच्या अनेक तरुण मुलांसोबत डेट केले.'न्यूयॉर्क पोस्ट'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, आरोपी लॉरा ओगलेस्बेने हिने कट रचून हे कृत्य केले आहे. यासाठी तिने आपल्या जवळच्यांनाही फसवले. २०१६ मध्ये लॉराने हे सर्व करायला सुरुवात केली आणि हे तिचे कृत्य दोन वर्षे चालू राहिले. मात्र, या महिलेची फसवणूक अखेर पकडण्यात आली. त्यानंतर तिला १९ लाखांचा दंड ठोठावण्यात आला.
मुलीच्या नावावर आईनं कॉलेजमध्ये घेतला प्रवेश; अनेक युवकांसोबत बनवले संबंध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 16:32 IST