शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

जर्मनीतील सर्वात खतरनाक सिरियल किलर; ८५ रुग्णांना ठार मारणाऱ्या परिचारकाला जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 02:56 IST

विषारी इंजेक्शन टोचून हत्या

ओल्डेनबर्ग : जर्मनीमध्ये रुग्णालयांतील ८५ रुग्णांची विषारी इंजेक्शन टोचून हत्या करणारा परिचारक (नर्स) निएल्स होगेल याला तेथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दुसºया महायुद्धानंतरच्या जर्मनीच्या इतिहासातील सर्वात खतरनाक सिरियल किलर म्हणून निएल्स कुख्यात आहे.

निएल्स ही शिक्षा सुनावली पण त्याने ज्या रुग्णांची हत्या केली त्यांच्या नातेवाईकांच्या मनात असलेले अनेक प्रश्न आजही अनुत्तरित राहिले आहेत असे जर्मन न्यायाधीश सॅबेस्टियन बुहरमन यांनी म्हटले आहे. नएल्सने २००० ते २००५ या काळात ८५ रुग्णांची हत्या केली होती. एका रुग्णाची विषारी इंजेक्शन टोचून हत्या करताना तो रंगेहाथ पकडला गेला. त्यानंतर त्याची काही महाभयंकर कृत्ये पोलीस तपासात उघडकीस आली.

निएल्सने आजवर २०० हून अधिक रुग्णांच्या हत्या केल्या असाव्यात असा पोलिसांचा संशय आहे. त्याचे पुरावे गोळा करण्यासाठी १३० रुग्णांच्या शवचिकित्सेचे अहवाल पोलिसांनी मिळविले असून त्याचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. निएल्स याला सहा हत्यांपायी याआधीही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तो गेली दहा वर्षे तुरुंगातच आहे. ज्याने सेवा करायची तो परिचारकच रुग्णांची हत्या करतो हे अतिशय क्रूर कृत्य आहे, असे न्यायाधीश सॅबेस्टियन बुहरमन यांनी म्हटले आहे.

निएल्स अवघा ४२ वर्षांचा असून त्याला आता अधूनमधून विस्मरण होते. त्यामुळे आपण नेमक्या किती हत्या केल्या हे तो सांगू शकतनाही. घटना सांगताना त्यातील तपशील, कालावधी यांचीही त्याच्याकडून कधीकधी गल्लत होते. ८५ रुग्णांच्या हत्यांसंदर्भातील खटल्याच्या सुनावणीच्या दिवशी मृत रुग्णांच्या नातेवाईकांची निएल्सने माफी मागितली. 

दाखल झाले तीन खटले२००५ साली डेल्मेनहॉर्स्ट येथील रुग्णालयात एका रुग्णाला विषारी इंजेक्शन टोचून ठार मारताना निएल्सला पकडण्यात आले. त्यानंतर खटला चालवला जाऊन त्याला २००८ साली सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.मृत रुग्णांच्या नातेवाईकांच्या दबावामुळे त्याच्यावर २०१४ साली दुसरा खटला दाखल करण्यात आला. त्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तिसरा खटला त्याच वर्षी दाखल झाला. त्यातही त्याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

टॅग्स :Germanyजर्मनी