शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Monkeypox: 'मंकीपॉक्स'ची दहशत! शारीरिक संबंधांबाबत अमेरिकेची विचित्र गाइडलाइन जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 16:08 IST

मंकीपॉक्स शरीरावर झालेल्या जखमांना स्पर्श करून पसरतो. याशिवाय तो हवेतूनही पसरू शकतो.

अमेरिका - यूरोप आणि अमेरिकेसह जगभरातील अनेक देशात मंकीपॉक्स(Monkeypox) पसरत चालला आहे. मंकीपॉक्सच्या दहशतीमुळे अमेरिका एजेंसी सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एन्ड प्रिवेंशन(CDC) नं शारीरिक संबंधांबाबत विचित्र गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. मंकीपॉक्सची लागण झालेला रुग्ण सेक्सद्वारे पार्टनरही संक्रमित करू शकतो असं सांगण्यात आले आहे. त्यामुळे जो कोणी मंकीपॉक्स संक्रमित आहे त्यांनी संबंध ठेवण्यापासून दूर राहावं असा सल्ला दिला आहे. अशाप्रकारे अनेक रुग्ण समोर आल्यानं CDC नं मंकीपॉक्स संक्रमित रुग्णांसाठी गाइडलाईन्स जारी केली आहे. 

CDC गाइडलाइननुसार, मंकीपॉक्स संक्रमित व्यक्तीनं त्याच्या पार्टनरसोबत संपूर्ण कपडे घालून संबंध ठेवावेत. शरीरावरील प्रत्येक अंग झाकणे गरजेचे आहे. मंकीपॉक्स संक्रमित रुग्णाने पार्टनरचे चुंबन घेऊ नये. त्याशिवाय सेक्सनंतर तातडीने दुसऱ्या पार्टनरने आंघोळ करावी, कपडे, चादर धुवावी. इतकेच नाही तर संक्रमित रुग्णांनी केवळ फोन सेक्सचा विचार करायला हवा असा विचित्र सल्ला CDC नं दिला आहे. 

मंकीपॉक्सची लक्षणे काय? मंकीपॉक्स शरीरावर झालेल्या जखमांना स्पर्श करून पसरतो. याशिवाय तो हवेतूनही पसरू शकतो. एखाद्याला मंकीपॉक्स झाला तर लक्षणे दिसायला सुमारे दोन आठवडे लागतात. पहिली लक्षणे फ्लूसारखी असतील. यामध्ये संक्रमित व्यक्तीला ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, पाठदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा जाणवते. ही लक्षणे सुरू होताच, १-३ दिवसांत, शरीरावर पुरळ उठल्यासारखे दिसते. परंतु आकाराने. कधीकधी ते वेदनादायक आणि खाज सुटू शकतात. यापैकी काही किंवा सर्व लक्षणे दिसू शकतात.

हा विषाणू ४० देशांमध्ये पसरला बुधवारी, अमेरिकेत मंकीपॉक्सची १२ रुग्ण नोंदवली गेली. एका दिवसात दाखल झालेल्या रुग्णांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. आतापर्यंत यूएसमध्ये नवीन रुग्णासह एकूण ८५ संख्या पोहचली आहे. त्याच वेळी, मंकीपॉक्स ४० देशांमध्ये पसरला आहे, ज्यामुळे सुमारे २००० लोक संक्रमित झाले आहेत.

मंकीपॉक्सचा फैलाव कसा झाला?मंकीपॉक्सचा विषाणू डबल स्टँडर्ड आहे. संशोधकांच्या मते हा आजार उंदीर, खार, उंदराचे मांस इत्यादींपासून पसरतो. मंकीपॉक्स हा आजार साथरोग प्रकारातील असल्याने झपाट्याने फैलावतो. फैलाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले जाणे महत्त्वाचे आहे. मंकीपॉक्सचे विषाणू हवेतूनही पसरत असल्याने मास्कही लावावा, असा संशोधकांचा सल्ला आहे.

टॅग्स :Americaअमेरिका