शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आता कोणत्या देशावर रशिया हल्ला करणार?; १० हजार सैन्य तैनातीच्या दाव्यानं युरोपमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 20:20 IST

जर माल्डोवात त्यांच्या समर्थकांचे सरकार बनले तर ते जास्त सैनिक तैनात करण्यास परवानगी देतील अशी रशियाला अपेक्षा आहे.

चिशिनाऊ - रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध ३ वर्षापासून सुरू आहे. त्यातच रशियाचे व्लादिमीर पुतिन सरकारने ट्रासंनिस्ट्रिया भागात १० हजाराहून अधिक सैन्य तैनात करण्याचा प्लॅन केला आहे. पुतिन यांचा माल्डोवा येथे त्यांच्या समर्थकाचे सरकार बनवण्याचा प्रयत्न आहे असा दावा माल्डोवाचे पंतप्रधान डोरिन रेसियन यांनी केला आहे. माल्डोवात पुढचे सरकार बनवण्यासाठी रशिया निवडणुकीत हस्तक्षेप करत आहे असं रेसियन यांनी म्हटलं आहे. 

पुतिन माल्डोवात असं सरकार आणू इच्छितात जे सहजपणे त्यांच्या सैनिकांना तैनात करण्याची परवानगी देईल असं सांगत डोरिन रेसियन यांनी युरोपला सतर्क केले आहे. रेसियन यांनी म्हटलं की, जर पुतिन यांचा हा प्लॅन यशस्वी झाला तर युरोपमध्ये रशियाचे वर्चस्व वाढण्यास मदत होईल. रेसियन यांनी दिलेला हा इशारा युरोपातील देशांची चिंता वाढवणारा आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युरोपला सातत्याने पुतिन यांच्या हेतूवर शंका वाटत आहे ते रेसियन यांच्या दाव्याने बळावली आहे.

रशिया ऑनलाईन प्रचार, पक्ष आणि मतदारांना बेकायदेशीरपणे पैसे ट्रान्सफर करत आहे. रशियाने २०२४ मध्ये त्यांच्या या अभियानात माल्डोवा येथील घरगुती उत्पादनावर एक टक्के खर्च केला आहे. रशियाला माल्डोवा येथे त्यांच्या समर्थनाचं सरकार आणायचे आहे. त्यामुळे रशिया इथल्या स्थानिक निवडणुकीत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पंतप्रधान डोरिन रेसियन यांनी एका मुलाखतीत केला. रशियाचा प्रयत्न युक्रेनच्या सीमेजवळील ट्रांसनिस्ट्रिया भागात १० हजार सैनिक तैनात करण्याचा आहे असं त्यांनी सांगितले.

जर माल्डोवात त्यांच्या समर्थकांचे सरकार बनले तर ते जास्त सैनिक तैनात करण्यास परवानगी देतील अशी रशियाला अपेक्षा आहे. जर रशियाने १० हजार सैन्य या भागात तैनात केले तर युक्रेनच्या दक्षिण पश्चिम भागावर किती ताण वाढू शकेल याची कल्पना करू शकता असं रेसियन यांनी युरोपीय देशांना सूचित केले आहे. सध्या या भागात रशियाचे १५०० सैन्य तैनात आहेत. त्यातील बहुतांश स्थानिक सैन्य आहेत. रेसियन यांच्या या दाव्यावर रशियाने मौन बाळगले आहे. १९९२ नंतर ट्रांसनिस्ट्रिया येथे रशियन सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती, जी अलीकडच्या काही वर्षात मर्यादित करण्यात आली आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया