शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी आयटी दिग्गजांसमक्ष मांडले ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न

By admin | Updated: September 28, 2015 02:27 IST

महत्त्वांकाक्षी ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेची कल्पना जगभरातील आयटी दिग्गजांसमक्ष मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामकाजात अधिकाधिक उत्तरदायित्व आणि पारदर्शकता आणण्याची ग्वाही दिली आहे

सान जोस: महत्त्वांकाक्षी ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेची कल्पना जगभरातील आयटी दिग्गजांसमक्ष मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामकाजात अधिकाधिक उत्तरदायित्व आणि पारदर्शकता आणण्याची ग्वाही दिली आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गजांच्या डाट्याबाबत गोपनीयता आणि सुरक्षितता बाळगण्याबाबत त्यांनी उपस्थितांना आश्वस्तही केले.सिलिकॉन व्हॅलीमधील सान जोस येथे विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी(सीईओ) आयोजित रात्रीभोज कार्यक्रमात ते बोलत होते. आमची अर्थव्यवस्था आणि जीवन आता आणखी तारांनी जोडले जाणार असताना आम्ही डाट्याची गोपनीयता, सुरक्षा, बौद्धिक संपदा अधिकार आणि सायबर सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आहोत, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी अ‍ॅडॉबचे सीईओ शांतनू नारायण, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला, क्वॉलकॉमचे कार्यकारी चेअरमेन पॉल जेकब्स, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई उपस्थित होते.ई-गव्हर्नन्सवर भर ई- गव्हर्नन्सचा अधिक प्रभावीरीत्या वापर करीत आम्ही प्रशासनात बदल घडवून आणत आहोत. अधिक पारदर्शक, उत्तरदायी आणि जनतेपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी ई-प्रशासनाचा सहभाग वाढविला जाईल. १ अब्ज सेलफोन असलेल्या भारतात मोबाईल गव्हर्नन्सच्या माध्यमातून विकासाला वास्तवात सर्वसमावेशक बनविण्याची क्षमता आहे. त्यामुळे ई गव्हर्नन्स सर्वांपर्यंत पोहोचेल, असेही मोदी म्हणाले. डिजिटल इंडियाच्या संकल्पनेमागचा विचार स्पष्ट करताना ते म्हणाले की, लोकांच्या जीवनात वेगाने बदल घडवून आणण्याचे हे सर्वात चांगले माध्यम आहे. सर्व शाळा आणि महाविद्यालयांना ब्रॉडबँडने जोडले जाईल.आय-वेजची निर्मिती ही हाय-वेच्या निर्मितीसारखीच महत्त्वपूर्ण आहे. वायफाय सुविधा केवळ विमानतळाच्या लाऊंजपुरती सीमित राहू नये. गुगलच्या मदतीने आम्ही अल्पावधीत ५०० रेल्वेस्थानकांना त्या कक्षेत आणणार आहोत. आम्हाला दस्तऐवजरहित काम करायचे आहे. प्रत्येक नागरिकासाठी डिजिटल लॉकरची व्यवस्था केली जाईल. आम्हाला खासगी दस्तऐवज त्याठिकाणी साठवून ठेवता येईल. अंतराळ तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या माध्यमातून १७० अप्लिकेशन्सची ओळख पटविण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणातील डाट्याचा २४ तासांत नव्हे तर २४ मिनिटांत निपटारा करता येईल.अ‍ॅप्पलच्या सीईओंना भारतात उत्पादन केंद्र स्थापण्यासाठी निमंत्रणमोदींनी अ‍ॅप्पलचे सीईओ टीम कूक यांना भारतात उत्पादन केंद्र स्थापन करण्याचे निमंत्रण दिले असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अ‍ॅप्पलच्या फॉक्सकॉन या सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने भारतात प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी पत्रकारांना सांगितले. अ‍ॅप्पल विकास टूल्सच्या माध्यमातून बड्या उद्योगाचा भाग बनू शकतात. चीनमध्ये या उद्योगातून १५ लाख लोकांना रोजगार देण्यात आल्याचा उल्लेखही कूक यांनी मोदींसोबत झालेल्या बैठकीत केला.जनधन योजनेत भागीदारीबाबतही मोदींनी कूक यांच्याशी चर्चा केली. अ‍ॅप्पलच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनात भारतासाठी विशेष स्थान आहे. स्टीव्ह जॉब्स युवावस्थेत भारतात आले होते. भारतात जे बघितले त्यापासून प्रेरणा घेतच त्यांनी अ‍ॅप्पलची सुरुवात केली होती, असेही कूक यांनी म्हटल्याची माहिती स्वरूप यांनी दिली. (वृत्तसंस्था)