शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

ब्रिक्स शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चीनमध्ये आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 06:21 IST

ब्रिक्स (ब्राझील-रशिया- भारत-चीन-दक्षिण अफ्रिका) देशांच्या शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रविवारी येथे आगमन झाले. सदस्य देशांमध्ये मैत्री बळकट व्हावी, यासाठी नेत्यांशी फलदायी चर्चा होऊन सकारात्मक निष्कर्ष निघतील, अशी मोदींना आशा आहे.

शियामेन (चीन) : ब्रिक्स (ब्राझील-रशिया- भारत-चीन-दक्षिण अफ्रिका) देशांच्या शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रविवारी येथे आगमन झाले. सदस्य देशांमध्ये मैत्री बळकट व्हावी, यासाठी नेत्यांशी फलदायी चर्चा होऊन सकारात्मक निष्कर्ष निघतील, अशी मोदींना आशा आहे.या दौºयात ते रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन व ब्रिक्स नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील, अशी अपेक्षा आहे. ते इजिप्तसारख्या देशांच्या नेत्यांनाही भेटतील. चीनने इजिप्त, केनया, ताजिकिस्तान, मेक्सिको आणि थायलंड यांनाही परिषदेसाठी बोलाविले आहे. तब्बल ७३ दिवस चीनबरोबर भारताचा डोकलाम येथे वाद सुरू होता. तो मिटल्यानंतर मोदी यांचा हा शिखर परिषदेसाठीचा प्रथमच चीन दौरा आहे. ब्रिक्सबद्दल बोलताना मोदी म्हणाले की, ‘या शिखर परिषदेनिमित्त नेत्यांना द्विपक्षीय पातळीवर भेटण्याची संधी आहे.’ ब्रिक्सच्या भूमिकेला भारताच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. प्रगती आणि शांततेसाठी ब्रिक्स देशांच्या स्थापन झालेल्या भागीदारीने दुसºया दशकात प्रवेश केला आहे.संपूर्ण जगाला भेडसावत असलेल्या आव्हानांना तोंड देण्यास आणि जगात शांतता व सुरक्षा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने ब्रिक्सची भूमिका महत्त्वाची असल्याचे मोदी म्हणाले होते. ब्रिक्स देशांच्या नेत्यांबरोबरच माझी इतर नऊ देशांच्या नेत्यांशीही चर्चा होईल, अशा अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.५ सप्टेंबर रोजी ब्रिक्स परिषद होत असून, ती चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी उगवती बाजारपेठ आणि विकसनशील देशांशी संवाद यासाठी आयोजित केली आहे. मोदी व जिनपिंग यांची मंगळवारी द्विपक्षीय भेट होण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी