शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी-शी जिनपिंग यांची चाय पे चर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 06:38 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात शनिवारी बऱ्याच विषयांवर चाय पे चर्चा झाली.

वुहान : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात शनिवारी बऱ्याच विषयांवर चाय पे चर्चा झाली. पण या चर्चेत डोकलाम तसेच चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचा मात्र उल्लेख झाला नाही. हा मार्ग पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्याने भारताचा त्यास आक्षेप आहे. या दोघा नेत्यांत या विषयांवर चर्चा झाली नाही, असे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.दोघे नेते सकाळी एकत्र चहा प्यायले. तरुणी चहा तयार करीत असताना मोदी बारकाईने त्याकडे पाहत होेते. नंतर स्वत: हातात चहाची किटली घेऊन मोदी यांनी भारतातील चहाच्या पद्धतीची त्यांना माहिती दिली.दोन देशांतील संबंध सुधारणे हा मुख्यत: चर्चेचा गाभा होता. परस्पर संवाद, परस्पर विश्वास यांचे वातावरण तयार करताना सीमेवर तणाव कमी व्हावा, या दृष्टीने पावले टाकण्याचे दोघांनी मान्य केले. तशा सूचना दोन्ही देशांच्या लष्करांना दिल्या जातील. दोन्ही लष्करांत सामंजस्याचे संबंध असावेत, असेही ठरले.नरेंद्र मोदी यांनी विचार, सहकार, सुसंवाद, बांधिलकी तसेच स्वप्नपूर्ती या नव्या पंचसूत्रीचा उल्लेख केला. व्यापारी संबंध सुधारण्यावर दोन्ही नेत्यांत एकमत झाले. दहशतवादाच्या धोक्याविषयीही मतैक्य होते. मात्र पाककडून दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद व आश्रय यांचा चर्चेत उल्लेख झाला नाही. पर्यावरणातील बदलांची दखलही मोदी व शी जिनपिंग यांनी घेतली.मोदी व जिनपिंग यांनी वुहानच्या ईस्ट लेक तलावापाशी आज मॉर्निंग वॉक केला. त्यानंतर दोघांनी त्या तलावात नौकानयनही केले. बोटीच्या वरच्या मजल्यावरून अतिशय स्वच्छ असलेल्या तलावाची पाहणी करताना, मोदी यांनी भारतातील नदी स्वच्छता मोहिमेसाठी चीनकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, असे सांगितले. गंगा नदी स्वच्छ अभियानाची त्यांना माहिती दिली. वुहान हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते.चौथा दौरा, अनेकदा भेटमोदी यांचा चार वर्षांतील हा चौथा चीन दौरा आहे. या चार वर्षांत मोदी व शी जिनपिंग यांची अनेकदा भेट झाली. पुन्हा जूनमध्ये शांघाय सहकार्य परिषदेसाठी मोदी चीनला जाणार आहेत. या दोन नेत्यांतील चर्चा व संबंध सुधारणा यांविषयी तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी आनंद व्यक्त केला आहे.चीन सातत्याने सीमेवर कागाळ्या करीत असतो. तसेच अरुणाचलच्या सीमेवर आपल्या हद्दीत चीनने मोठी बांधकामे सुरू केली आहेत. त्यामुळे अनेकदा तेथून व उत्तराखंडात चिनी सैन्य घुसखोरी करीत असते. काही वेळा चीनची हेलिकॉप्टर्सही भारतीय हद्दीत घुसतात.पुढील वर्षी भारतात लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने या काळात चीनकडून कोणतीही कागाळी होऊ नये, असा पंतप्रधान मोदी यांचा प्रयत्न आहे. एकीकडे पाकिस्तानकडून हल्ले, अतिरेक्यांची घुसखोरी सुरू असताना चीनकडून अडचणी नकोत, अशी केंद्र सरकारची इच्छा आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी