शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मोहीम फत्ते... थायलंडमधील गुहेत अडकलेली सर्व मुलं सुखरूप बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 10:44 IST

गेल्या 15 दिवसांपासून नौदल कर्मचारी व डायव्हर्स यांची सुरू असलेली मोहीम आज फत्ते झाली.

माए साई - थायलंडच्या गुहेत अडकलेल्या 12 मुलांची सुटका करण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसांपासून नौदल कर्मचारी व डायव्हर्स यांची सुरू असलेली मोहीम आज फत्ते झाली. विशेष म्हणजे या 12 मुलांसह त्यांच्या फुटबॉल प्रशिक्षकासही गुहेतून सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. गुहेत अडकलेल्या फुटबॉल संघातील चार विद्यार्थ्यांना रविवारी बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर आज हे 'मिशन सेव्ह चाईल्ड' पूर्ण झाले आहे. अमेरिका, इस्रायल यांच्यासह भारतानेही या रेस्क्यू मोहिमेत सहभाग घेतला होता.

थायलंडच्या या गुहेतून बाहेर काढताच मुलांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार करून मगच त्यांना घरी पाठवण्यात येणार आहे. सोमवारी ज्या मुलांना गुहेतून बाहेर काढण्यात आले, त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुहेबाहेर रुग्णवाहिका तसेच हेलिकॉप्टर तयार ठेवण्यात आले होते. गेल्या 15 दिवसांपासून त्या गुहेमध्ये मुलं आणि प्रशिक्षक यांचा मृत्यूशी संघर्ष सुरू होता.  जगाचे लक्ष लागलेल्या या रेस्क्यू मोहिमेचा आज शेवट झाला. त्यानंतर, गुहेबाहेर असलेल्या सर्वच मुलांच्या पालकांचा जीव भांड्यात पडला. भारत सरकारने व केबीएलने युद्ध पातळीवर हालचाल करून त्यांचे डिझाईन प्रमुख व मिरजेचे प्रसाद कुलकर्णी यांची टीम तातडीने शुक्रवारी रात्री थायलंडला रवाना केली. थायलंडला पोहोचताच या टीमने कामास सुरूवात केली आणि फ्लड पंप्स सुरू केले. पाण्याचा उपसा केल्यामुळे गुहेतील बचावकार्याला गती आली आणि 8 मुलांना दोन दिवसांमध्ये बाहेर काढणे शक्य झाले. त्यानंतर आज उर्वरीत 4 मुलांसह प्रशिक्षकासही बाहेर काढण्यात आले. एकंदरीत जगभरातून मिळालेल्या मदतीच्या सहाय्याने तब्बल 15 दिवसानंतर ही रेस्क्यू मोहीम फत्ते झाली.

टॅग्स :ThailandथायलंडFootballफुटबॉल