ह्यूस्टन : अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील एका रुग्णालयात रुग्णाच्या पित्याने दोन लोकांना ओलिस ठेवले होते. चार तास चाललेल्या ओलिस नाट्यानंतर या पित्याने शरणागती पत्करली. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता या माणसाने दोन लोकांना आपल्या ताब्यात घेतले. रात्री १०.४५ वाजता शरणागती पत्करत त्याने ओलिसांना सोडून दिले. १५० एकर परिसरात पसरलेल्या टॉमबॉल रिजनल मेडिकल सेंटरमध्ये ही घटना घडली. (वृत्तसंस्था)
टेक्सासमधील ओलिस नाट्य संपले
By admin | Updated: January 12, 2015 00:51 IST