शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Video - निरागस डोळे अन् गोबरे गाल; भूकंपाच्या 128 तासांनी ढिगाऱ्याखालून बाळ सुखरुप बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 11:17 IST

एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये 128 तास ढिगाऱ्याखाली राहिल्यानंतर दोन महिन्यांचं बाळ जिवंत बाहेर आलं आहे. 

तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतरचे अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील. प्रत्येक फोटो काळीज पिळवटून टाकणारा आहे. आजूबाजूला मृतदेहांचे ढीग पडले आहेत. रुग्णालयांमध्ये मृतदेह ठेवायला जागा नाही. कोणाचे संपूर्ण कुटुंब हिरावले गेले, तर कोणाच्या घरातील कर्ती व्यक्ती. जगातील अनेक देशांनी बचावकर्ते पाठवले आहेत जे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. याच दरम्यान, अनेक चमत्कारही पाहायला मिळत आहेत. एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये 128 तास ढिगाऱ्याखाली राहिल्यानंतर दोन महिन्यांचं बाळ जिवंत बाहेर आलं आहे. 

मुहम्मद बेराम नावाच्या युजरने @Muhamme02062811 या हँडलने हा फोटो सर्वप्रथम ट्विटरवर शेअर केला होता. बघता बघता तो जगभर व्हायरल झाला. मुलाचा हसरा चेहरा, निरागसता पाहून लोकांचे डोळे पाणावले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा या मुलाला बाहेर काढण्यात आले तेव्हा तिथे उपस्थित असलेले लोक रडू लागले. त्यांनी आनंदात टाळ्या वाजवल्या. देवाचे आभार मानले. इतके तास मृत्यूला सामोरे जाऊनही मुलाचा चेहरा किती गोंडस आहे, हे व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

एक दिवसापूर्वी शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ आतापर्यंत तब्बल सात लाख वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ हजारो लोकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. लोक मुलावर खूप प्रेम दाखवत आहेत. त्याच्या आरोग्याबद्दल प्रश्न विचारत आहेत. अनेकांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नसल्याचे सांगण्यात येत आहेत. लोक त्याला जन्मजात फायटर म्हणत आहेत आणि बचाव पथकाचे आभार मानत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भूकंपानंतर ढिगाऱ्यात गाडलेल्या व्यक्तीला Whatsapp ने दिलं जीवदान; लोकेशन शेअर केलं अन्...

तुर्कीमध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांनी मदतीची विनंती करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केल्याची घटना समोर आली आहे. लोकेशन शेअर करून आपला जीव वाचवण्याचे आवाहन केले. त्यामुळे अनेकांचा शोध घेता आला आणि अनेकांचे प्राण वाचवण्यात बचाव कर्मचार्‍यांना यश आले. अशाच प्रकारे एका विद्यार्थ्याने Whatsapp चा वापर केला, त्यानंतर त्याला आणि त्याच्या आईला वाचवण्यात यश आले आहे. बोरान कुबत असं या 20 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव असून त्याने Whatsapp व्हिडीओ अपीलमध्ये त्याचे लोकेशन शेअर केले होते, त्यानंतर तुर्कीमधील एका अपार्टमेंटच्या ढिगाऱ्याखालून त्याला वाचवण्यात यश आले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :SyriaसीरियाEarthquakeभूकंप