शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

चमत्कारच म्हणा ना... नऊ दिवसांनी ढिगाऱ्यातून महिला जिवंत बाहेर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 11:00 IST

महिलेला वाचवले; अशी चौथी घटना

अंकारा : तुर्कस्तानातील भूकंपानंतर सुमारे २०३ तासांनी चमत्कारिकरीत्या  एक महिला ढिगाऱ्यात जिवंत सापडली. अशा प्रकारची ही मागील काही दिवसांतील चौथी घटना आहे. ४० वर्षीय महिलेला दक्षिणेकडील हाते प्रांतातील इमारतीच्या ढिगाऱ्यातून कर्मचाऱ्यांनी सुरक्षित बाहेर खेचले. तिची ओळख अद्याप अज्ञात आहे. बचावकर्त्यांनी आदल्या दिवशीच ढिगाऱ्यातून तीन जणांची सुखरूप सुटका केली होती.   

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत ३६ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर-अल-असद यांनी तुर्कीसोबत आणखी दोन सीमा खुल्या करण्याची घोषणा केली आहे. याद्वारे संयुक्त राष्ट्र भूकंपाशी संबंधित मदत सामग्री सीरियामध्ये पाठवू शकणार आहे. सीरियामध्ये २०११ मध्ये सुरू झालेल्या गृहयुद्धानंतर प्रथमच या सीमा खुल्या करण्यात आल्या आहेत. 

तुर्की-सीरियात भारताचे ३०० सैनिक  तुर्कस्तानमध्ये मदतीसाठी भारत सरकारने सात विमाने आणि ३०० जवानांच्या माध्यमातून मदत सामग्री पाठवली आहे. याशिवाय प्रशिक्षित कुत्रे हनी आणि रॅम्बोही कर्तव्य बजावत आहेत.

...मग मुलाचे नाव ‘तुर्की चौधरी’ ठेवा! n‘ऑपरेशन दोस्त’चा भाग म्हणून तुर्कीला गेलेले हवालदार राहुल चौधरी यांना नुकतेच पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यांना आपल्या मुलाला पाहण्याची खूप ओढ लागली; पण तूर्त तरी या बाप-लेकाची भेट होणे कठीण. लष्करातील त्यांच्या मित्रांनी या मुलाचे नाव तुर्की चौधरी ठेवण्याचा सल्ला दिला आहे.nउत्तर प्रदेशातील हवालदार चौधरी तुर्कीला गेलेल्या ९९ सदस्यीय संघाचा भाग आहेत. पत्नीच्या प्रसूतीसाठी ते घरी जाणार होते. 

टॅग्स :Earthquakeभूकंप