शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

अन्न-पाण्याविना लाखो लोक संकटात; गाझात अनेक भागांची वीज तोडली, मदतकार्यही ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 12:51 IST

या संघर्षामुळे गाझातील लाखो रहिवाशांना अन्नधान्य, औषधे तसेच पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. त्या भागातील पिण्याचे पाणी, वीजदेखील तोडण्यात आली आहे.

सॅन दिएगो : हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा भागाला घेरले असून तिथे जोरदार मारा करण्यात येत आहे. या संघर्षामुळे गाझातील लाखो रहिवाशांना अन्नधान्य, औषधे तसेच पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. त्या भागातील पिण्याचे पाणी, वीजदेखील तोडण्यात आली आहे. अशीच स्थिती आणखी काही दिवस राहिल्यास गाझामधील रहिवाशांवरील संकट आणखी गहिरे होण्याचा इशारा मानवतावादी संघटनांनी दिला आहे. 

संघटनांकडून लोकांना अन्नधान्य, वैद्यकीय मदत पुरविली जाते. त्या भागातील सुमारे ६३ टक्के लोकांपर्यंत मदत पोहोचविण्यात संघटना यशस्वी झाल्या होत्या. मात्र, २३ लाख लोकांना अन्नधान्य, इंधन व तसेच इतर वस्तूंचा पुरवठा करण्यास इस्रायलने १० ऑक्टोबरला बंदी घातली. 

युद्ध इतर देशांत पसरेल: इराणगाझावर इस्रायलने हल्ले करणे त्वरित न थांबविल्यास हे युद्ध पश्चिम आशिया व अन्य देशांतही पसरू शकते, असा इशारा इराणचे परराष्ट्रमंत्री हुसैन अमीर अब्दुल्लाहियां यांनी दिला आहे. त्यांनी लेबनॉनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी इस्रायलच्या हल्ल्यांबाबत चर्चेनंतर सिरियाचा दौरा केला. 

मध्य-पूर्व देशांत निदर्शनेमध्य- पूर्व देशांमध्ये हजारो लोकांनी पॅलेस्टाइनला पाठिंबा दर्शविण्यासाठी व इस्रायलचा निषेध करण्याकरिता निदर्शने केली. लेबनॉनमधील बैरूत शहर, इराणमधील तेहरान, इराकमधील बगदाद शहरात अशी निदर्शने झाली. पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये काही जणांनी इस्रायल, अमेरिकेचे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले. 

१६ वर्षांपासून बंदी मदतकार्य करणाऱ्या संघटनांचे काम ठप्प झाले आहे. गाझा पट्टीमध्ये इस्रायलने अनेक वस्तूंचा पुरवठा करण्यास गेल्या १६ वर्षांपासून बंदी घातली आहे. मात्र अन्नधान्य, इंधन यांच्या पुरवठ्यावर बंदी नव्हती. 

तर तडफडून मरतीलसंघर्ष लांबला तर गाझातील लाखो लोक अन्न-पाण्यावाचून तडफडून मरण्याची शक्यता असल्याची भीती मानवतावादी कार्य करणाऱ्या संघटनांनी व्यक्त केली आहे.  

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsraelइस्रायलelectricityवीज