शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मालीमध्ये लष्करी चौकीवरील अतिरेकी हल्ल्यात ५३ सैनिक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 06:01 IST

नायगरच्या सीमेला लागून असलेल्या मेनाका प्रांतात भूसुरुंगाच्या स्फोटात एक नागरिकही ठार झाला आहे

बामको : आफ्रिका खंडातील माली देशाच्या ईशान्य भागात एका लष्करी चौकीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ५३ सैनिक ठार झाले आहेत. मालीमध्ये अलीकडच्या काळात इस्लामी अतिरेक्यांनी केलेला हा सर्वांत मोठा हल्ला ठरला आहे.

नायगरच्या सीमेला लागून असलेल्या मेनाका प्रांतात भूसुरुंगाच्या स्फोटात एक नागरिकही ठार झाला आहे, असे मालीचे जनसंपर्कमंत्री याया संगारे यांनी सांगितले. परिस्थिती पूर्णत: नियंत्रणात असून, शोध तसेच मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. लष्करी चौकीजवळ १० जण जखमी अवस्थेत आढळून आले आहेत, असे संगारे यांनी सांगितले. माली सरकारने जारी केलेल्या निवेदनात हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. घटनास्थळी मोठा फौजफाटा पाठविण्यात आला असल्याचेही सरकारने म्हटले आहे. शेवटचे वृत्त आले तोपर्यंत कोणत्याही अतिरेकी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नव्हती. हल्ल्यानंतर मालीची राजधानी बामकोमध्ये एका लष्करी तळाबाहेर जोरदार निदर्शने झाली. महिनाभरापूर्वी मालीमध्ये बुकरिना फासोच्या सीमेला लागून असलेल्या भागात दोन जिहादी अतिरेक्यांनी हल्ला केला होता. त्यात ४० सैनिक ठार झाले होते. आफ्रिकेतील अतिरेकी कारवायांचा मुकाबला करण्यासाठी २०१४ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या जी५ साहेल फौजांसाठी हा हल्ला अवमानकारक आहे. जी५ साहेल फौजेत ५ हजार सैनिक आहेत. बुर्किना फासो, चाड, माली, मॉरिटानिया आणि नायगर या पाच देशांनी एकत्र येऊन ही फौज स्थापन केली आहे. (वृत्तसंस्था)मालीमध्ये जेहादी बंड उद्भवले आहे. हे बंड शमविण्यासाठी मालीचे लष्कर संघर्ष करीत आहे. उत्तरेकडील ओसाड प्रदेशातून सुरू झालेली ही बंडाळी मध्य मालीपर्यंत आली आहे. अस्थिर असलेला हा संपूर्ण प्रदेश वांशिकदृष्ट्या संमिश्र स्वरूपाचा आहे. २०१२ मध्ये उत्तर मालीमध्ये बंडाची पहिली ठिणगी पडली होती. हे बंड मोडून काढण्यात मालीच्या लष्कराला अपयश आले. तेव्हापासून हा भूभाग अल-कैदाशी संबंधित जेहादी गटांच्या ताब्यात आहे.