शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

हंगेरीतील स्थलांतराचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: September 3, 2015 22:42 IST

आॅस्ट्रिया आणि जर्मनीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे ब्युडापेस्टच्या केलेटी स्थानकावर रोखल्यानंतर हंगेरी सरकारविरोधात सीरियन स्थलांतरितांनी निदर्शने तीव्र केल्या होत्या

ब्युडापेस्ट : आॅस्ट्रिया आणि जर्मनीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे ब्युडापेस्टच्या केलेटी स्थानकावर रोखल्यानंतर हंगेरी सरकारविरोधात सीरियन स्थलांतरितांनी निदर्शने तीव्र केल्या होत्या. आज एका रेल्वेने केलेटीमधील काही स्थलांतरितांना आॅस्ट्रियाच्या सीमेवरिल सोप्रोन गावापर्यंत जाण्याची संधी देण्यात आली. मात्र व्हिएन्ना आणि जर्मनीच्या दिशेने कोणतीही रेल्वे सोडण्यात आली नाही. स्थलांतरितांना आता कोणत्याही परिस्थितीत स्वीकारावे लागणारच हे मान्य केल्यामुळे युरोपियन युनियन त्यांना कसे सामावून घ्यायचे याची तयारी करु लागले आहे. ब्रुसेल्स बैठकीमध्ये त्यावर तोडगा काढला जाईल असे वाटते. राष्ट्राची एकूण संपत्ती व मूळ लोकसंख्या यांच्या आधारावर किती स्थलांतरित नागरिकांना प्रत्येक देशाने सामावून घ्यायचे याचा फॉर्म्युला तयार केला जाईल व त्यानुसार स्थलांतरित नागरिक स्वीकारले जातील. जमर्नी, फ्रान्स, इटली व ग्रीस यांनी यापुर्वीच स्थलांतरितांचे समान वाटप व्हावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे ब्रुसेल्स बैठकीनंतर या प्रश्नाने निर्माण झालेला ताण कमी होईल अशी अपेक्षा आहे.हंगेरियाचे पंतप्रधान व्हिक्टर ओर्बन स्पष्टवक्ते आणि फटकळ बोलण्यामुळे ते नेहमीच वादात राहिले आहेत. आताही स्थलांतरित लोकांबाबत सौम्य भूमिका घेणाऱ्या युरोपसंघाच्या आयुक्तांवर त्यांनी सरळ टीका केली आहे. जर्मनीचे प्रसिद्ध वर्तमानपत्र फॅ्रंकफर्ट अ‍ॅल्गेमेइन झायटुंगला मुलाखत देताना ते म्हणाले, आधीच युरोपच्या ख्रिश्चन धारणा व तत्वांना धरुन ठेवणे आवाक्याच्या बाहेर गेले आहे, त्यात स्थलांतरितांच्या लोंढ्यामुळे युरोपच्या ख्रिश्चन मुळावरच घाला येणार आहे. आता आपल्या डोळ््यासमोर जे काही चालले आहे त्याचे युरोपला भयावह परिणाम भोगावे लागणार आहेत असेही ते म्हणाले. ओर्बन यांनी युरोपियन संघाचे अध्यक्ष मार्टिन शुल्झ यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आज हंगेरीयन लोक घाबरले आहेत, युरोपचे सर्व नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत कारण या कठिण प्रसंगावर त्यांचे नेते ताबा मिळवू शकत नाहीत, हे त्यांना दिसत आहे, असे त्यांनी शुल्झ यांना सांगून टाकले.