शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच 'ब्लाइंड डेट'वर भेटला, अवघ्या ४ तासांत लग्नही केले; पण एका महिन्यात होत्याचे नव्हते झाले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 15:53 IST

चीनमधील एका व्यक्तीने ब्लाइंड डेटवर भेटलेल्या महिलेसोबत अवघ्या ४ तासांत लग्न केले. ही घाई त्याला इतकी महागात पडली की..

सामान्यता एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटल्यानंतर लोक एकमेकांना ओळखण्यासाठी वेळ देतात, भेटीगाठी करतात आणि त्यानंतरच लग्नाचा निर्णय घेतात. पण चीनमधील एका व्यक्तीने ब्लाइंड डेटवर भेटलेल्या महिलेसोबत अवघ्या ४ तासांत लग्न केले. ही घाई त्याला इतकी महागात पडली की, लग्नाच्या एका महिन्याच्या आतच त्याची ३० लाख रुपयांहून अधिक बचत संपली. फसवणुकीची ही संपूर्ण कहाणी ऐकून सर्वजण थक्क झाले आहेत.

९ मध्यस्थांनी केली होती शिफारस

साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या हुनान प्रांतातील हेंगयांग येथे राहणाऱ्या हुआंग झोंगचेंग (वय ४०) या व्यक्तीसोबत हा धक्कादायक प्रकार घडला. हुआंग हे २१ ऑगस्टच्या सकाळी एका ब्लाइंड डेटसाठी निघाले होते.

हुआंग यांनी हुनान ब्रॉडकास्टिंग सिस्टमला सांगितले की, "ब्लाइंड डेटच्या रस्त्यात मला अचानक आठ मध्यस्थ भेटले. माझ्या गावातील एका व्यक्तीसह एकूण ९ लोकांनी एकाच महिलेची मला शिफारस केली." या शिफारशीमुळे हुआंग यांनी त्या महिलेची भेट घेतली आणि त्यानंतर अवघ्या चार तासांतच त्यांनी लग्न देखील केले.

आजचा दिवस स्वप्नासारखा!

हुआंग यांच्या म्हणण्यानुसार, त्या महिलेने त्याच दिवशी सर्व काही निश्चित करण्याचा आग्रह धरला. "त्यामुळे सायंकाळी ५ वाजता आम्ही लग्नाची नोंदणी करण्यासाठी गेलो. सर्व काही इतक्या जलद गतीने झाले की दिवसभर मी आश्चर्यचकित झालो होतो. मी तिला म्हटलेही की आजचा दिवस एखाद्या स्वप्नासारखा वाटत आहे," असे हुआंग यांनी सांगितले.

लग्नाच्या रात्री ते एका हॉटेलमध्ये थांबले. हुआंग यांचा दावा आहे की, त्यांनी त्या महिलेसोबत केवळ दोनच दिवस एकत्र घालवले. त्यानंतर त्या महिलेने पैसे कमावण्याचे कारण देऊन गुआंगडोंग प्रांतात जाण्याचा आग्रह धरला आणि नंतर वारंवार वेगवेगळी कारणे देत पैशांची मागणी सुरू केली.

एक महिन्यात संपली संपूर्ण बचत

हुआंग यांना लवकरच कळले की त्यांच्यासोबत मोठी फसवणूक झाली आहे. लग्नाच्या एका महिन्याच्या आतच त्यांची संपूर्ण बचत, जी जवळपास २,४०,००० युआन (सुमारे ३० लाख रुपये) इतकी होती, ती पूर्णपणे संपली होती.

हुआंग म्हणाले, "जेव्हा मी तिच्याशी संपर्क साधायचो, तेव्हा ती सहसा उत्तर देत नव्हती. पण जेव्हा कधी ती उत्तर द्यायची, तेव्हा ती फक्त पैशांबद्दल बोलायची." २१ ऑगस्टला ब्लाइंड डेटवर भेटल्यानंतर ८ सप्टेंबरपर्यंत, म्हणजे एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत, तिने हे सर्व पैसे खर्च केले होते, असे हुआंग यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे ब्लाइंड डेटवर घाईत निर्णय घेणाऱ्यांना एक मोठा धडा मिळाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Blind date, quick wedding, financial ruin: A cautionary tale.

Web Summary : A Chinese man married a woman four hours after a blind date. Within a month, she'd allegedly swindled him out of ₹3 million, highlighting the dangers of hasty decisions.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया