शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

लाल कपड्यांतील स्त्रिया पुरूषांना वाटतात सेक्सी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2017 12:06 IST

लाल रंगाचे कपडे घातलेल्या स्त्रिया या पुरूषांना अधिक पसंत पडतात.

ऑनलाइन लोकमतपॅरिस, दि. 23 - लाल रंगाचे कपडे घातलेल्या स्त्रिया या पुरूषांना अधिक पसंत पडतात. हे बऱ्याच वेळा दिसून आलं आहे आणि वेगवेगळ्या प्रयोगांतून सिद्धही झालं आहे. फ्रांसमधील युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केले आहे. त्यांनी असं अनुमान काढलं की, लाल कपड्यांतील स्त्रिया पुरूषांना अधिक आकर्षक वाटतात. यासाठी त्यांनी एक प्रयोग केला.18 ते 21 वयोगटातील 120 पुरुषांना त्यांनी चार ग्रुपमध्ये विभागलं. प्रत्येकाला विविध रंगाच्या कपड्यातील तरुणींचे फोटो 30 सेकंद दाखवले. प्रत्येक ग्रुपमधील मुलांनी लाल कपड्यातील मुलीच्याच फोटोला पसंती दिली. इतर रंगाचे कपडे घातलेल्या मुलींचे फोटो आकर्षक असूनही त्यांना लाल कपड्यातील ललनाच मनमोहक वाटली. लाल कपड्यातील तरुणी सहज आपल्याबरोबर शय्यासोबतीला तयार होतील, असं पुरुषांना वाटतं.यानंतर त्यांना दिलेल्या प्रश्नावलीत आपल्याला लाल कपड्यातील स्त्रियांशी सेक्स करायला आवडेल असं उत्तर दिलं होतं. याचा मानसशास्त्रीय वेध घेताना लक्षात आलं की लाल रंगाचे कपडे घातलेल्या स्त्रिया या अधिक आकर्षक दिसतात. या कपड्यातील स्त्रियांकडे पाहून कामवासना जागृत होते. कारण, लाल रंग हाच मुळात आक्रमकतेचं प्रतिक आहे. हा रंग सेक्समधील वासना, रोमांस आणि प्रजनन या गोष्टींशी संबंधित आहे, त्यामुळे या कपड्यातील स्त्रिया अधिक आकर्षक वाटतात. त्यामुळे कामवासना जागृत करण्यासाठीही लाल रंग प्रभावी ठरतो.