शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये चक्क केएफसीची तस्करी; कारवाई करणाऱ्या पोलिसांनी डोक्यावर हात मारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 15:22 IST

लॉकडाऊन असल्यानं शहरातील रेस्टॉरंट्स बंद; तब्बल १२० किलोमीटरवरून आणलं चिकन

ऑकलंड: न्यूझीलंड पोलिसांनी दोघांना तस्करी प्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी दोघांकडून केएफसी चिकन आणि मोठी रोकड जप्त केली आहे. देशात लागू असलेल्या कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं भंग केल्याचा गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे. केएफसी चिकन घेऊन दोघे जण ऑकलंडमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत होते. ऑकलंडमध्ये सध्या कठोर लॉकडाऊन सुरू असून चौथ्या स्तराचे निर्बंध लादू आहेत. 

ऑकलंडमधील हॉटेल, रेस्टॉरंट्स सध्या बंद आहेत. हॉटेलमधून घरी पार्सल नेण्यासही परवानगी नाही. मात्र दोन तरुण केएफसी चिकन आणण्यासाठी ऑकलंडहून १२० किलोमीटर दूर असलेल्या हॅमिल्टनला गेले होते. दोघे कारनं शहराबाहेर आले असताना पोलिसांना संशय आला. 'ग्रॅव्हेल रोडवर पोलिसांची कार पाहताच दोघांनी यू-टर्न घेतला आणि पोलीस तपासणी चुकवण्यासाठी कार वेगानं पळवली,' अशी माहिती पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिली.अमृताप्रमाणे घेतला जातोय बकरीच्या दूधाचा शोध; १६०० रुपये मोजूनही मिळेना; पण झालंय तरी काय..?

पोलिसांनी कारचा पाठलाग करत दोघा तरुणांना रोखलं. त्यांच्या कारची झडती घेण्यात आली. त्यावेळी पोलिसांच्या हाती मोठी रोकड आणि केएफसीची बरीच पार्सल्स लागली. कारमधून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंचा फोटो पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे. जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये ३ चिकन बकेट्स, १० कप कोलेस्लॉ (सलाड), फ्राईजचं मोठं पॅकेट आणि केएफसीचे पदार्थ असलेल्या इतर चार मोठ्या बॅगांचा समावेश आहे. याशिवाय कारमधून १ लाख न्यूझीलंड डॉलरदेखील पोलिसांनी जप्त केले आहेत.